भटके-विमुक्तांच्या प्रश्नांसदर्भात रविवारी गोलमेज परिषद

Spread the love

पुणे – राज्यामध्ये अद्याप भटके आणि विमुक्तांची संख्या मोठया प्रमाणावर आहे, परंतु त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी येत्या रविवारी (दि. २७) गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, यशवंतराव चव्हाण समाजकार्य विद्यालय, राष्ट्रसेवा दल, निर्माण स्वयंसेवी संस्था आणि ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट  यांच्यातर्फे सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ गणेश देवी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. प्रदिप आगलावे, माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी दिली. संतोष जाधव, वैशाली भांडवलकर, दिपक म्हस्के यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हि गोलमेज परिषद होणार आहे. यामध्ये आमदार कपिल पाटील, सुरेखा दळवी, लता प्र. म, अ‍ॅड जयदेव गायकवाड, अरुण खोरे, सदा डुंबरे, डॉ. अनिल अवचट आदी मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love