पुणे–आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे मात्र, हे सरकार चार वर्षे चालणार नाही, का चालणार नाही ते गुलदस्त्यात आहे त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही ,असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल गुढ वाढविले आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही असेही ते म्हणाले.
पुणे पदवीधर मतदार संघासाठी भाजपच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, जनता या सरकारला त्रासली आहे तेच सरकार बदलवतील घटनेच्या बाहेर जाऊन आम्ही काही करणार नाही सरकार पडणार नाही.ते त्यांच्या अंतर्गत वादातून पडेल. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवित आहोत” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल तुम्ही कामगार विद्यार्थी शेतकरी महिला अशा 1 हजार मतदारांचा सर्व्ह करा त्यातले 900 जण भाजपला मतदान करतील असे त्यांनी सांगितले.
बिहार आणि इतर ठिकाणच्या पोट निवडणुकीच्या निकालांचा परिणाम, राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवर स्वाभाविकपणे होणार आहे. या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली असून त्याच जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवाराचा प्रचार करतील, असे ते म्हणाले.
पुणे पदवीधर भाजपची परंपरागत जागा आहे. संग्राम देशमुख युवकासबंधीच्या अनेक संस्था आणि ट्रस्टचे अध्यक्ष आहे, पदवीधर आमदार असताना मी अनेक गोष्टी केल्या आहेत. संग्राम देशमुख यांच्यासह आमचे तीन पदवीधर तसेच सगळे उमेदवार शिक्षक पदविधरांच्या प्रश्नांवर भांडतील त्यांनी नमूद केले.
मंदिर मस्जिद चर्च जैन मंदिर असे सर्वच उघडले पाहिजे जशी पोटाची भूक तशी मनाची भूक भागवली पाहिजे. न्यायालयाने जैन मंदिरे उघडण्यासाठी जो आदेश दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
जळगाव जिल्ह्यात एका दलित मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी जळगाव येथे येणार का? असा सवाल त्यांनी केला.