पुणे—भाजपा नेते एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून मात्र, याबाबत कुठलेही सुतोवाच केलेले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता, ‘मला एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल काहीही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राजकारणात अनेकदा भेटीगाठी चालूच असतात. एखाद्याची भेट झाली म्हणजे नक्की काही तरी काळंबेरं आहे असा अर्थ होत नाही. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाहीये. जितकी माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला दिली