पुणेः- पुणे विचारपीठच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सेवा सहकार्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नुकताच शुभारंभ करण्यात आलेल्या रमाई पोळी-भाजी केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरील पाचशे निराधार लोकांना भोजन देण्यात आले.
यावेळी नाना पेठ पोलीस चौकीचे पीएसआय परवेझ शिखलकर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता डीएसआय फिरोज काद्री, नाना पेठ परिसरातील डॉक्टर अरूण जोशी आणि रमाई पोळी-भाजी केंद्राचे विठ्ठल गायकवाड या कोविड योद्ध्यांचा सत्कार साळखीपीर तालिम मारूती मंदिरचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्रअण्णा माळवदकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन शिवराज माळवदकर, आशिष देसाई, योगेश मोरे, शिवानी माळवदकर यांनी केले. याप्रसंगी राजेंद्र धनवडे, भाई कात्रे, ईशुब शेख, आकाश ताठे, अथर्व कात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक आणि ग्राहक यांच्यात लावण्यात येणा-या प्लास्टीक सुरक्षा कवचाचे 35 रिक्षा चालकांना वाटप करण्यात आले.ही मूळ संकल्पना रिक्षा फेडरेशनचे सेक्रेटरी प्रदीप भालेराव आणि सुरेश जगताप यांची होती.
तसेच गुरूवार पेठेतील सेंट जोसेफ वृद्धाश्रमात सॅनिटायझर सेट आणि बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. पोलीस, सफाई कर्मचारी, पथारी व्यावसायिक आदी कोविड योद्ध्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.