शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ : इयत्ता ७ वी आणि ४ थीची शिष्यवृत्ती परीक्षा  एकाच दिवशी होणार

scholarship Exam
scholarship Exam

maharashtra scholarship exam 2026–महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास आता २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ अशी मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने ही द्वितीय आणि अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. दरम्यान, इयत्ता ७ वी आणि ४ थीची शिष्यवृत्ती परीक्षा  सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित  करण्यात आली आहे. या परीक्षेची अधिसूचना ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

अधिक वाचा  पुण्याच्या कोथरूड भागात रानगव्याचे दर्शन: उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. ज्या शाळांनी अद्याप आपल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरले नाहीत, त्यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे आवश्यक आहे. या विहित मुदतीनंतर कोणत्याही प्रकारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व मुख्याध्यापक आणि पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.

सदर परीक्षेची सविस्तर अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी आणि माहितीच्या प्रसारासाठी ही सूचना राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, यासाठी शाळांनी तत्परतेने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love