हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा – प्रदीप रावत

हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा
हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा

पुणे(प्रतिनिधि)–धार्मिक परंपरेनुसार आपण आपल्या कुटुंबातील पितरांचे श्राद्ध करतो ही खूप प्राचीन परंपरा आहे. डॉ. हेगडेवार यांनी सांगितल्याप्रमाणे काही कौटुंबिक सणांचे राष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे आवश्यक आहे. केवळ आपले पितर नाही तर हिंदू समाजाचे जे पितर आहेत, विशेषत: सातव्या शतकाच्या शेवटच्या दशकांपासून आजतागायत हिंदुसमाजाच्या विकासासाठी, धर्म जतन करण्यासाठी त्यांचे हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा अशी अपेक्षा माजी खासदार प्रदीप रावत  यांनी व्यक्त केली.

अरुंधती फाउंडेशनच्या विद्यमाने आणि श्री देवदेवेश्वर संस्थान तसेच श्री ओंकारेश्वर देवस्थानाच्या सहकार्याने,  सर्वपित्री अमावस्येनिमित्त आज गेल्या सुमारे 1000 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत, हिंदुस्थानवर झालेल्या परकीय आक्रमणात हताहत झालेल्या लाखो हिंदू पूर्वजांच्या पुण्यस्मृतीला वंदन करून श्रद्धांजली वाहून तर्पण संस्कार आयोजित केला होता यावेळी प्रदीप रावत बोलत होते.

अधिक वाचा  समाजसेवेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचे सहाय्य घ्यावे : डॉ. दीपक शिकारपूर

याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग  बलकवडे,  श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणेचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत,  श्री ॐकारेश्वर देवस्थान, पुणेचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, आयोजक   हिमांशू आणि  आदित्य गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पांडुरंग बलकवडे म्हणाले,  वेद ही जगातील पहिली विचारांची निर्मिती आहे. आपल्या संकसरूतीची महती बघा आजही आपण प्रभू राम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारांनी वाटचाल करत आहोत. आपली संस्कृती जगाला मार्गदर्शन करणारी आहे. आपल्याला जगात  आपला विचार शाश्वतपणे टिकवायचा असेल तर आपल्याला आपली संस्कृती टिकवावी लागेल यांचा विचारातून या सामूहिक तर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वजांचे स्मरण हे अत्यंत महत्वाचे आहे, त्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही.

या कार्यक्रमाची संकल्पना आणि संपूर्ण नियोजन अरुंधती फौंडेशनच्या आदित्य गुप्ते यांनी केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love