मी स्वतःच माझा आयडॉल : नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याचे मत

मी स्वतःच माझा आयडॉल
मी स्वतःच माझा आयडॉल : नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याचे मत

पुणे(प्रतिनिधी)–ज्या परिस्थीतून मी हे यश संपादन केले आहे ते मला माहित आहे, त्यामुळे मी स्वतःच माझा आयडॉल असल्याचे मत नेमबाजीतील ब्राँझ पदक विजेता नेमबाज पटू स्वप्नील कुसाळे याने गुरुवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तो बोलत होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, प्रशिक्षक दीपाली देशपांडे उपस्थित होते.

स्वप्निल म्हणाला, मी जे यश संपादन केले ते मला माहित आहे. मी कुठल्याही दडपणाखाली आलो नाही. माझे मानसोपचारतज्ञ यांनी फक्त मला बॉडीवर फोकस ठेवायला सांगितला होता. दडपण कसे हाताळतो हे महत्त्वाचे असते. दडपण कसे दूर करायचे हे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे मीच स्वतःच माझा आयडॉल आहे.

अधिक वाचा  भारतातील ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोचविण्यासाठी सरकारी – खाजगी भागीदारी महत्वाची : डॉ. आर. जी. अगरवाल

याच खेळात पुढे करीअर करण्याचे ठरवले. प्रशिक्षक, शासनाचे अधिकारी आणि शासनाकडून मिळालेल्या सहकार्याने हे यश मिळाले आहे. हे जरी यश मिळाले असले तरी या यशाने मी जास्त खुश नाही. माझे सुवर्ण पदकाचे ध्येय आहे आणि ते मी साध्य करणारच, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.

सोशल मिडीयावर जास्त वेळ न देता स्वतःवर फोकस ठेवायचा हे मी ठरवले. सोशल मिडीयामुळे टाईम वेस्ट होतो. ग्रामीण भागातही खेळाडू तयार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे स्वप्निलने यावेळी सांगितले.

दोन सामन्यादरम्यान जो वेळ असतो त्यामध्ये सर्व खेळाडू आपापल्या कन्फर्ट झोनमध्ये असतात. त्यांना त्या गोष्टी केल्या की रिलॅक्स वाटते. मी दोन सामन्यांच्या मध्ये माझ्या बॉडीवर फोकस ठेऊन होतो. त्यामुळे मला रिलॅक्स वाटत होते, असे स्वप्निलने यावेळी नमूद केले.

अधिक वाचा  नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे : पद्मविभूषण डॉ. माशेलकर : द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा शुभारंभ

प्रशिक्षक देशपांडे म्हणाल्या, आमच्या पिढीकडे टेक्निकल नॉलेज होते. ते आमच्या प्रशिक्षकांकडे नव्हते. त्यावेळे ऑलिंम्पीकमध्ये जाणे हे स्वप्नवत होते. पण, आत्ताच्या पिढीमध्ये ऑलिंम्पीकमध्ये मेडल जिंकणे हे स्वप्न असते. त्यांनी ते स्वप्न साकार केले. त्याची सुरुवात स्वप्निलपासून झाली.

या खेळाच्यादृष्टीने गेल्या दहा पंधरा वर्षात बऱयाच गोष्टी बदलल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात प्रत्येकाने ऑलिंम्पीक जिंकले पाहिजे असे नाही. खेळताना यश मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण, इतर क्षेत्रातही करिअर घडवू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love