लोकशाहीआणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी देशात साठे व टिळक पुन्हा निर्माण होण्याची गरज : गोपाळदादा तिवारी

There is a need to re-create Sathe and Tilak in the country to protect democracy and constitutional rights
There is a need to re-create Sathe and Tilak in the country to protect democracy and constitutional rights

पुणे- स्वातंत्र्योत्तर भारतात, लोकशाही मार्गाने आलेल्या पुर्वीच्या सरकारांनीच् बनवलेल्या शिक्षण हक्क कायद्याची तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य यांची पायमल्ली व गळचेपी होण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत असतील तर लोकशाही संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी व सामाजिक जागृतीसाठी, देशांत पुन्हा शाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांसारखे क्रांतिकारक पुन्हा निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, मातंग एकता आंदोलन, साठे वस्ती, ४५२ सदाशीव पेठच्या वतीने  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपण प्रतिनिधीत्व केलेल्या साठे वस्ती, ४५२ सदाशीव पेठ या परीसरातुन ऊपमहापौर स्व. शंकरराव म्हात्रे यांच्या कार्याचा वसा चालू ठेवल्या बद्दल संयोजकांचे अभिनंदनही त्यांनी केले. प्रारंभी, लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अधिक वाचा   ‘चला भेटूया, मताधिक्य गाठूया’: मोहोळांच्या विजयासाठी दिवंगत आ. विनायक निम्हणांचा मित्र परिवारही मैदानात

या प्रसंगी माजी आमदार मोहनराव जोशी, जेष्ठ काँग्रेसजन व कामगार नेते  सुर्यकांत उर्फ नाना मारणे, राजू नाणेकर, राजेश उर्फ सनी सुतार इ उपस्थित होते. ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व वह्या वाटप’ कार्यक्रमाचे संयोजक मातंग एकता आंदोलन, अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे सर्वश्री किरण म्हात्रे यांनी प्रास्ताविक तर सुत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री निलेश वैराट यांनी केले. या प्रसंगी समाज विकास मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी स्व. सुमित नाना वैराट यांना श्रदांजली वाहण्यात आली.

लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती औचित्याने ‘महाराष्ट शासन लाडकी बहिण योजनेचे’ फॅार्म भरून ही घेण्यात आले. अभिवादन कार्यक्रमास सर्वश्री आविनाश भाऊ बागवे, अॅड मोनिका ताई खलाणे, जयंती उत्सव अध्यक्ष किरण म्हात्रे, सहकारी निलेश वैराट, राजू नाणेकर, ओंमकार भिसे, अनिकेत लोणारे, भरण खवळे, राहुल सकट, संतोष वैराट, कमलेश सकट, विजय परदेशी, राहूल शेंडगे, भाऊ साळूंके, कुणाल काळे, नंदकुमार चाैरगे, सोनिया मात्रे, तनुष्का लोणारे, समॄधी मात्रे व अन्य कार्यकतै मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love