बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती  अशीच होणार- रोहित पवार

The battle of Baramati will be like people power vs money power
The battle of Baramati will be like people power vs money power

पुणे(प्रतिनिधि)—संपूर्ण लक्ष्य लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघ मतदानाच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.तर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत भोर तालुक्यात एका गावात रात्री पैशांचं वाटप झाल्याचा आरोप केला.  

बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शहर शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी केला आहे

अधिक वाचा  चक्क कुरिअरने तलवारी आल्याने खळबळ

दरम्यान, भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप करण्यात आल्याचे सांगत पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.  ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या.  तणावातून वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. संशयीत वाहनामध्ये घड्याळ चिन्हाचे प्रचार करणारे काही साहित्य देखील आढळले.

घडलेल्या प्रकरानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे खिसे आणि वाहने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एवढ्या मध्यरात्री  गावात तुमचे काम काय आहे? अशी ग्रामस्थांकडून विचारणा देखील करण्यात आली.

अधिक वाचा  तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा : अमोल कोल्हेंचे अजित दादांना खुले आव्हान

यंदाची बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती  अशीच होणार- रोहित पवार

दरम्यान, मंगळवारी सकाळी बारामती येथे आमदार रोहित पवार हे मतदान करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, “मतदानाच्या अगोदरच्या दिवशी सर्व ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. भोरमध्ये जी गाडी फोडली त्यात पैसे सापडले. बारामतीत कधीही पैसे वाटले गेले नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वाटप करण्यात आले, खर तर ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनधक्ती अशीच म्हणावी लागेल. पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी पैसे नाकारले. सर्व सामान्य नागरिकांसाठी पुणे जिल्हा बँक ही ५ वाजता बंद होते. मात्र यांच्यासाठी रात्री एक एक वाजेपर्यंत सुरू राहते. तसेच कर्मचारी देखील यात सहभाग घेतात. हे खूप वाईट आहे. त्यामुळे यंदाची बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती  अशीच होणार आहे.

अधिक वाचा  भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले - नरेंद्र मोदी

राज्य सरकारने ज्यांना कुणाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. ती यासाठीच दिली आहे. भोरमध्ये हे पैशांचे वाटप झाले ते मावळचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. तसेच जे साखर कारखाने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्या कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच ही निवडणूक आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love