पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी; माजी आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांची मागणी

Police Commissioner Amitesh Kumar should be transferred
Police Commissioner Amitesh Kumar should be transferred

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी एका माजी आयएएस अधिकारी अरुण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून केली आहे. भाटिया यांनी हे पत्र पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच लोकायुक्त, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयालाही पाठवले आहे. दरम्यान पुण्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या (ससून) मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी संगनमत करून एका गुन्हेगाराला वाचवले, असा दावा भाटीया यांनी केला आहे.

अरुण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मी या प्रकरणात तुमचा (मानवी हक्क आयोगाचा) हस्तक्षेप मागतो कारण या प्रकरणाने आम्हाला हादरवून टाकले आहे आणि आमची असुरक्षितता वाढविली आहे.  आम्हाला आमच्या प्रशासनाचा आणि लोकशाहीचा भयानक चेहरा दाखवला आहे. भ्रष्ट अधिकारी आणि त्रस्त नागरिक आता दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. भाटिया यांनी पुणे पोलिस आयुक्तांना अपयशी पोलीस आयुक्तदेखील म्हटलं आहे.

अधिक वाचा  मिलिंद वाळंज यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : खासदार ओमराजे निंबाळकर

आरोपीने मद्यपान केले की नाही हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने पाठविण्यास पोलिसांना सहा तासांहून अधिक वेळ लागला. इतकंच नाही तर रक्त तपासणीपूर्वी पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा खायला दिला, मग डॉक्टरांनी सॅम्पल नष्ट केला, असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

निष्पक्ष चौकशीसाठी पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करावी

पोलिस आयुक्त हे शहरातील पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी त्यांची तातडीने पुण्याबाहेर बदली करून त्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाटिया यांनी केली. एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे झाल्याने राज्याने राजकारण तापले आहे. १९ मे च्या रात्री भीषण अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यात पोलिसांसह डॉक्टरांचे कारनामे बाहेर आले आहेत. त्यामुळे थेट आयुक्तांची बदली व्हावी, अशी मागणी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love