भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा- बावनकुळे

मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील?
मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील?

पुणे(प्रतिनिधि)–परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत असा सणसणीत टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना भाजप आणि संघावर सडकून टीका केली. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.

अधिक वाचा  राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्यामुळे माफी मागण्याची मागणी

परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…असे बावणकुळे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून म्हणत त्यांनी कविताही पोस्ट केली आहे.

अधिक वाचा  एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश

कभी थे अकेले हुए आज इतने

नही तब डरे तो भला अब डरेंगे

विरोधों के सागर में चट्टान है हम

जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे

लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा

कदम बढ रहा है कभी न रुकेगा

न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा

निडर है सभी हम अमर है सभी हम

के सर पर हमारे वरदहस्त करता

गगन में लहरता है भगवा हमारा॥

भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love