जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतातच : नाट्य संमेलनात फडणविसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतातच
who perform plays; People make them sit at home

Devendra Fadnavis : महाराष्ट्राने 2019 मध्ये ‘कट्यार पाठीत घुसली’चा प्रयोग पाहिला. मात्र, 2022 मध्ये आता होते, गेले कुठे, अशी त्यांची अवस्था झाली. जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतातच, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सेना नेते उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर रविवारी नाट्य संमेलनात निशाणा साधला.

अ. भा. नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. सांस्कृतिकमंत्री (Cultural Minister) सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल(Jabbar Patel), मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले(Prashant Damale) , आयोजक भाऊसाहेब भोईर(Bhausaheb Bhoir) आदी उपस्थित होते.  या वेळी नाट्यपरिषदेच्या सोलापूर शाखेकडे संमेलनाच्या पुढच्या टप्प्याची सूत्रे सोपविण्यात आली.

देवेन्द्र फडणवीस म्हणाले, आम्ही नाटके करतो, हे खरे आहे. अभिनेता शब्दाची फोड अभि व नेता अशी होते. यातील अभिचे दोन अर्थ सापडतात. एक अभि म्हणजे अधिकचा, तर दुसऱ्या अभिचा अर्थ प्रेक्षकांच्या निकटचा असा आहे. नेता हा असा असतो. मात्र, राजकारणात नाटके केलेली चालत नाहीत. जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतात. माहाराष्ट्रातील राजकीय नाट्य सर्वांनी पाहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी ‘कट्यार पाठीत घुसली’चा प्रयोग केला. त्यानंतर आम्ही तो 2022 मध्ये उलटवला. त्यानंतर या मंडळींची गत ‘आता होते, गेले कुठे’, अशी झाली.

अधिक वाचा  वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प ठरेल पथदर्शी- मुरलीधर मोहोळ

कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, तरी त्याचा परिणाम नाट्य वा तत्सम माध्यमांवर होणार नाही. कारण हे माध्यम भावनाविरहित  आहे. ते मानवी संवेदना देऊ शकत नाही, असे सांगत आपला राजा लवकरच जन्मस्थानी विराजमान होतोय, ही आनन्ददायी बाब आहे. आपल्या नाट्य क्षेत्राने राम कायमच जपला. पहिले नाटक सीता स्वयंवर, पहिला बोलपट अयोध्येचा राजा म्हणून उल्लेख होतो. त्यातच सर्व आले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मराठी रंगभूमी संपणार नाही

मराठी व रंगभूमी व रंगकर्मी यांचा मराठी नाटक टिकविण्यात मोठा वाटा आहे. आजही मराठी रंगभूमी सर्वोत्तम आहे. मूकपट, बोलपट ते ओटीटी अशी स्थित्यंतरे मराठी नाटकाने पाहिली आहेत. मराठी रसिक जिवंत आहे,  तोवर नाटक संपणार नाही. आता ग्लोबल मराठी रसिक झाला आहे. त्यामुळे तुम्हाला जगात जावे लागेल. हौशी, समांतर, झाडी पट्टी अशा सर्व नाट्य परंपरांची चळवळ पुढे नेली पाहिजे. लोककलांच्या संवर्धनाकरिता काय करता येईल, त्यातून अर्थार्जन कसे होईल,  हेही पाहू. वृद्ध कलावंतांकरिता आराखडा तयार करा. त्यांनाही नक्की मदत करू. समाजाला समृद्ध करायचे असेल, तर कला, साहित्याचा विकास झाला पाहिजे. आम्ही राज्यकर्ते म्हणून या चळवळीच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अधिक वाचा  अण्णाभाऊंना ‘भारतरत्न' मिळण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार, विनोद तावडे यांची ग्वाही

…तर कितीतरी प्रश्न सुटतील : फडणवीस

मला नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यावर मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटले, या प्रशांत  दामले यांच्या विधानाचा धागा पकडून फडणवीस म्हणाले, आमच्याकडे कुणाला असे वाटून गेले, तर कितीतरी प्रश्न सुटतील.

..तर भाडे वाढविण्याची मागणी कराल : मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याऐवजी वाढवा, अशी मागणी तुम्ही कराल, इतके नाट्य रसिक वाढले पाहिजेत. नाटक ही सांस्कृतिक विरासत आहे. ती आपण सर्वदूर पोहोचविली पाहिजे. सरकार सर्वांच्या पाठीशी आहे.

नेत्यांनी द्रुत लयीत आदेश द्यावेत : डॉ जब्बार पटेल

डॉ जब्बार पटेल, नाट्य संमेलनात दोन तरी पाश्चात्य नाटके येऊ दे. आमचा झगडा मंत्रालयाशी होतो. तेथे अधिकारी सतत विलंबित लयीत असतात. नेत्यांनी आदेश द्रुत लयीत द्यावेत. जेणेकरून नाटकाचे प्रश्न मार्गी लागावेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love