रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये -पंकजा मुंडे

राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे
राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे

Pankaja Munde : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या ( sugarcane worker ) मजुरीमध्ये (Wages) ३४ टक्के (९२ रुपये) वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार(Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde)  यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर गुरुवारी येथील साखर संकुलमध्ये(Sakhar Sankul)  झालेल्या अखेर तोडगा निघाल्याने उसतोड कामगार(Shugarcane Worker)  संघटनांनी कोयता बंद आंदोलन(Koita Bandh Movement) टळले आहे. दरम्यान, मुकादमांच्या कमिशनमध्ये देखील एक टक्क्याची वाढ करण्यात आली आहे. (The time should not come to protest on the streets)

पुण्यातील साखर संकुलमध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या (Sugar Factory ) प्रतिनिधींची बैठक गुरुवारी संध्याकाळी पार पडली. अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता. राज्य साखर महासंघाचे पी. आर. पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी बैठकीसाठी उपस्थित होते.

अधिक वाचा  अमृत महोत्सवाच्या शासकीय जाहिरातीमध्ये स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे फोटो, राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान छापण्याची मागणी

ऊसतोड कामगारांना सध्या २७४ रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात ३४ टक्के वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना चालू हंगामापासून ३६६ रुपये प्रति टन इतकी मजुरी मिळणार आहे. दरम्यान, मुकादमांच्या कमिशनमध्ये देखील एक टक्क्याची वाढ करण्यात आली असून त्यांना मजुरीच्या २० टक्के कमिशन देण्यात येणार आहे.

रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये -पंकजा मुंडे

राज्यातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच काम अपेक्षित गतीने पुढे जात नसल्याचे   संगत आपण त्याबद्दल असमाधानी असल्याचं पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं देखील पंकजा मुंडे  म्हणाल्या. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

अधिक वाचा  जेव्हा अजितदादा सर्वांसमोर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याची खरडपट्टी करतात

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभू श्रीरामाविषयी काय बोलले ते आपल्याला माहीत नसल्याचं सांगत त्या विषयावर प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love