पुणे- पुण्यामध्ये शनिवारी दिवसभरात ८२७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यान, १६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबाधित एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ८१६ झाली आहे.
सध्या, ४६१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २६९०४ असून त्यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५१०९ आहे तर ससून रुग्णालयात ९८५
पुण्यातील आतापर्यंतच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०९२ वर पोहचली असून आजपर्यंतच एकूण १६९९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज ३५११ नवीन नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आणि अँटिजेन किटद्वारे ८८७ जणांची तपासणी करण्यात आली.