कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते?


ऑनलाईन टीम- मार्चमध्ये, चीनच्या हुबेई प्रांतातील झोंगनान रुग्णालयामध्ये एका संशोधनावर आधारित अभ्यास केला गेला ज्यामध्ये असे म्हटले होते की ‘ए’ रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, तर ‘ओ’ रक्तगटाच्या लोकांना धोका कमी असतो. परंतु, काय आहे सत्य?

त्यानंतर, जूनच्या सुरूवातीस, जर्मनीच्या कील विद्यापीठातही याबाबत संशोधन केले गेले.  त्याचे निष्कर्ष हे चीनच्या संशोधनाशी मिळतेजुळते होते. या अभ्यासानंतर, डॉक्टरांमध्येही  उपचारांबद्दल संभ्रम निर्माण झाला, तर सामान्य लोकांमध्येही याची खूप चर्चा झाली.

 जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाही वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक प्रकारची संशोधन चालू आहे. भारतीय शास्त्रज्ञांसह जगभरातील संशोधक आणि तज्ञ कोरोनाची लक्षणे, तिची रचना, परिणाम, उपचार, औषधोपचार, लस इत्यादींवर संशोधन करीत आहेत. कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच, अनेक संशोधनांवर आधारित, असे सांगितले गेले आहे की, प्रतिकारशक्ती असणारी व्यक्ती, वृद्ध किंवा आधीच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा जास्त धोका असतो.

अधिक वाचा  मानसिक आरोग्यासाठी 'कनेक्टिंग' महत्वपूर्ण: काय आहेत मानसिक आजाराचे लक्षणं?

मग कोरोना संसर्गाचा रक्तगटाशी अधिक संबंध आहे काय?  मार्चमध्ये चीनमध्ये आणि जूनमध्ये जर्मनीमध्ये झालेल्या संशोधान्नुसार कोरोना संक्रमणाचा धोका रक्तगटावर आधारित होता. मात्र, चीन व जर्मनीमध्ये झालेल्या संशोधनावर आधारित केलेला हा दावा एका आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधन टीमने नाकारला आहे.   

अमेरिकन संशोधन जर्नल ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ मध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की, ‘ए’ किंवा ‘ओ’ रक्तगटामुळे व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकत नाही किंवा वाढू शकत नाही. एका आंतरराष्ट्रीय संशोधन टीमच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासात ही महत्वाची माहिती दिली आहे.

पूर्वी केलेल्या अभ्यासानुसार असे मानले जाते की ‘ए’ ग्रुप असलेले लोक विषाणूच्या संसर्गाची शक्यता जास्त असतात तर ‘ओ’ ग्रुपचे लोक तुलनेने कमी असुरक्षित असतात.

अधिक वाचा  हिंदुस्तान अँटिबायोटिक करणार आता आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन

मात्र, या शास्त्रज्ञांनी पूर्वीचा निष्कर्ष नाकारला आहे. रक्तगट कोरोना संक्रमणाचा धोका निर्धारित करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  या अभ्यासात यूएसए, इस्त्राईल, फ्रान्स, ब्रिटनमधील अनेक संस्थांनी संयुक्तपणे भाग घेतला आहे.

मॅसेच्युसेट्स हॉस्पिटलची तज्ञ आणि या अभ्यासाचे अग्रगण्य संशोधक डॉ.अनिहिता दुआ म्हणतात की या अभ्यासात आम्हाला एकही  तथ्य सापडले नाही, ज्याच्या आधारे आपण निष्कर्ष काढू शकतो की,  ओ, ए, बी किंवा ए-बी  अशा एका विशिष्ट रक्तगट असणाऱ्या व्यक्तीसच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त अथवा कमी असू शकतो

 या अभ्यासामध्ये सामील झालेल्या फ्रेंच संशोधक जैक्स ली पेंडू  म्हणतात की रक्तगट आणि कोरोना संसर्गामध्ये कोणताही संबंध आढळला नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की वैज्ञानिक अभ्यास ही एक सतत प्रक्रिया आहे, त्यानुसार संशोधनात किती प्रमाणात माहिती जोडली जाते, त्या आधारे पुढील अभ्यासांचे निष्कर्ष ठरवले जातात. ते आधीच्या संशोधनाच्या अगदी उलटही असू शकतात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love