अभिनेत्री केतकी चितळेचा दारू पितानाचा फोटो व्हायरल – केतकीने दिले फेसबुक पोस्टद्वारे उत्तर


मुंबई—मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या सोशल मिडीयावरील विविध पोस्टने ते वादात सापडली आहे. नुकताच केतकीने स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्यानंतर टीका करणाऱ्यांविरोधात आक्रमक फेसबुक पोस्ट लिहित निशाणा साधला होता. आता तिचा दारू पितानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने आणखी एक फेसबुक पोस्ट शेअर करून टीकाकारांना उत्तर दिले आहे.

‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये केतकीने आपली भूमिका स्पष्ट केली होती.

अधिक वाचा  #controversial Films In 2023 : 2023 मध्ये हे चित्रपट ठरले वादग्रस्त

तिच्या या पोस्टनंतर ती सोशल मिडीयावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. आता सोशल मिडियावर तिचे काही फोटो व्हायरल केले जात आहेत. ज्यामध्ये एका फोटोत ती दारू पिताना दिसते आहे. तिने हा फोटो व्हायरल झाल्यानंतर हा फोटो व्हायरल करणार्यांना आणखी एक फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिले आहे.

या पोस्टमधून केतकीने आरोप आणि सत्य असे दोन फोटो शेअर केले असून एका बाजूला तिचा दारू पितानाचा व्हायरल होत असलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला दारूतून सरकारला मिळणारा कर याबाबतची बातमी असलेला फोटो शेअर केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love