अकराव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या


पुणे—कोरोनाच्या संकटाने नैराश्या आल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असतानाच पुणे जिल्ह्यातील मोशी येथे एका २४ वर्षीय अभियंत्याने एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अक्षय पोतदार (वय २४, रा. चिखली, साने चौक. मूळ गाव – वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

त्याने ज्या इमारतीवरून उडी मारली तिथे तो राहत नव्हता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आई, बाबा आणि बहीणला सांभाळ मी दुसऱ्या जगात जात आहे, अशा आशयाचे व्हाट्सअॅप स्टेटस् त्याने आत्महत्येपूर्वी ठेवले असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. लॉकडाउन झाल्यापासून तो सातारा येथील वाई या मूळ गावी गेला नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा  गुप्तांगात सोने लपवून सोन्याची तस्करी : महिलेला अटक

अक्षय हा चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहण्यास होता. तो एका खासगी कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत होता. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील ‘वुड्स व्हिला’ फेज तीन सोसायटीत तो आला. या इमारतीच्या टेरेसवर काम असल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगत त्याने चावी मागितली. परंतु, सुरक्षा रक्षकाने चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळ वाट पाहून दुसरा सुरक्षा रक्षक येताच इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये जायचे असल्याची नोंद करून त्याने इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावर जाऊन तेथून थेट खाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love