सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर ; चांदीही वाढली


सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन सोने पोहचले ५४,६७८ रुपयांवर

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर  विकारमी पातळीवर पोहचला. सोन्याच्या दरात सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन एका तोळ्यासाठी(१० ग्राम) सोन्याचा दर ५४,६७८ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा दर ५४,४९३ प्रती टोला इतका होता. चांदीच्या भावानेही प्रतिकिलो १६७२ रुपयांची उसळी घेत ६६,७४२ प्रतिकिलोवर  स्थिर झाला. शुक्रवारी चांदीचा दर ६५.०७० प्रतिकिलो होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, “रुपया विनिमय दरात घसरण झाल्याने दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 185 रुपयांची वाढ झाली.”

देशांतर्गत शेअर बाजारात झालेली पडझड यामुळे  सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात 20 पैशांची घसरण होत तो 75 रुपये प्रति डॉलरच्या खाली (प्रारंभिक आकडेवारी) बंद झाला.    आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या भावात घसरण होत १९७३ डॉलर प्रति औंस इतका झाला तर चांदीच्या भावात प्रतीऔंस २४.३० डॉलरवर घसरला.   

अधिक वाचा  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह कसा झाला? दोघांनी घरच्यांना लग्नासाठी कसे पटवले? लग्नात हुंडा म्हणून काय मिळाले?

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love