राम मंदिरासाठी महिलेने केला तब्बल २८ वर्षे उपवास

राष्ट्रीय
Spread the love

जबलपूर(ऑनलाईन टीम)—अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचे व्हिडीओ आणि छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. मात्र, श्रीरामावर निस्सीम भक्ती असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने तेव्हापासून संकल्प केला होता. श्रीराम मंदिराचा जोपर्यंत पाया घातला जात नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प करून तिने आजतागायत अन्न ग्रहण केलेलं नाही.

पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्याबरोबर या ८१ वर्षीय महिलेचीही तपास्याही पूर्ण होणार आहे. गेली २८ वर्षे ही महिलेचा उपवास सुरु आहे. केवळ फलाहार करून आणि राम नामाचा जप करून हे महिला उपवास करीत आहे.

र्मिला देवी असे या जेष्ठ महिलेचे नाव असून ती मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील विजयनगर येथील रहिवासी आहे. या महिलेने अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वयाच्या ५३ वर्षापासून ते आजतागायत उपवास सुरु आहे. सुरुवातीला उर्मिला देवी यांना लोकांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. रामा मंदिराच्या बाजूने न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उर्मिला देवींना खूप आनंद झाला होता. त्यांनी अयोध्या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते.

 राम लल्लाच्या दर्शनानंतर करणार अन्न ग्रहण

पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करतील. या दिवशी उर्मिला देवी दिवसभर घरात राम नावाचे पठण करणार आहेत. अयोध्येत रामलल्ला पाहिल्यावरच त्यांनी भोजन करावे अशी तिची इच्छा आहे. त्याचे कुटुंब त्यांना समजावून सांगत आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे केवळ आमंत्रित लोक अयोध्येत येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांनी उपवास सोडावा परंतु ते स्वीकारण्यास त्या तयार नाहीत.

उर्वरित आयुष्य अयोध्येत घालवण्याची इच्छा

उर्मिला देवींचे म्हणणे आहे की, अयोध्येत राम मंदिर होणे हे त्यांच्यासाठी पुनर्जन्म झाल्यासारखे आहे. आपला संल्कल्प पूर्ण झाला आहे. आता उर्वरित आयुष्य अयोध्येमध्ये व्यतीत व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना थोडीशी जागा हवी आहे.

भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राहता येत नसल्याने खेद

जेव्हा पंतप्रधान मंदिरासाठी भूमिपूजन करतील त्यावेळी उर्मिलादेवी घरी राम नावाचा जप करतील. भूमिपूजनाच्या पूजेसाठी उपस्थित राहता येत नसल्याने त्यांना खेद वाटतो आहे. परंतु टी रामाची इच्छा आहे असे मानून समाधान व्यक्त करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की काही लोक याचा संबंध कोरोना विषाणूच्या समाप्तीशी जोडून अंधश्रद्धा पसरवत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *