राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर  काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, युवराज ढमाले याने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलवून अथवा माझे जबाब न घेता आणि कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. तसेच, या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याच्या युवराज ढमाले या त्यांच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरुन भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा राजकीय षडयंत्रातून दाखल झाल्याचा दावा काकडे यांनी केला असून आपल्याला न्याय मिळावा अशी भूमिका त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मांडली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

त्यावर ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन काकडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती. खूप अस्वस्थ वाटल्यानेच माझे मेव्हणे माजी खासदार संजय  काकडे आणि बहिण उषा संजय काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची वेळ आली, असा खुलासा युवराज ढमाले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यामागे कुठलेही राजकीय षड्यंत्र नाही किंवा पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असण्याचे कारण नाही.या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असेही ढमाले म्हणाले.

 ढमालेम्हणाले, “कौटुंबिक ईर्ष्येतून काकडे दाम्पत्याने २०१७ पासून वेळोवेळी माझ्यवर दबाव आणण्याचा परयत्न केला. घरातील वाद सामंजस्याने मिटवण्याचा आणि प्रचंड दबावाखाली असल्याने गेली दोन वर्षे गुन्हा दाखल करू शकलो नाही. परंतु, आता खूप अस्वस्थ व दबाव वाटू लागल्याने भीतीपोटी धीर एकवटून २७ मी रोजी पोलिसांना पत्र दिले. त्यानंतर २ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी एका दिवसात गुन्हा दाखल केल्याचे सांगून काकडे माध्यमांची दिशाभूल करत आहेत.

काकडे यांच्याशी गेल्या १० वर्षात माझा कुठलाही व्यावसायिक संबंध नव्हता, हे चुकीचे सांगितले आहे. २३ मी २०१९ रोजी आमच्यातील व्यवहार झाला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावा- बहिणीतील हा वाद चव्हाट्यावर आला. तीन वर्षांपासून राखी बांधून घेता आली नाही, याचे दु:ख वाटते. माझ्या प्रगतीची ईर्ष्या करणारी माझीच बहिण आहे, याचेही अधिक वाईट वाटते. आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा विचार करणाऱ्या बहिणीला ईश्वराने सुबुद्धी द्यावी असे ते म्हणाले.

दरम्यान, संजय काकडे यांनी  इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत एखादी व्यक्ती तक्रार देत असेल तर, पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली.

महाराष्ट्रातील पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले? कोणी त्यांच्यावर दबाव आणला? याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी सजय काकडे यांनी केली आहे.दरम्यान, ढमालेने तक्रार दाखल केल्याच्या दोन दिवस अगोदर व पोलीस स्टेशनच्या संबंधीत अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावेत, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

वास्तविक 29 ऑगस्ट 2017 आणि 29 ऑगस्ट 2018 या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आला असतानाच भेट झालेली आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या तीन वर्षात त्याच्याबरोबर माझं बोलणं देखील झालेले नाही. माझी पत्नीदेखील त्याच्याबरोबर एक वर्षांपासून बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी सोपान बागेतील एका प्रकल्पामध्ये युवराज ढमाले भागीदार होते. परंतु, त्यानंतर गेल्या दहा वर्षांत आमचा कोणताही व्यवसाय ढमालेबरोबर भागिदारीमध्ये नाही. त्यामुळे ढमाले याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. यामागे राजकीय षडयंत्र आहे. कोणीतरी ढमालेला पुढे करून अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे काम केले असावे, असे ते म्हणाले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *