‘अभिजित’ मुहुर्तामध्ये मोदींसाठी ३२ सेकंद महत्वाचे; कसे होणार श्रीराम मंदिराचे भूमिपूजन?

राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— येत्या 5 ऑगस्ट रोजी ‘अभिजित’ मुहूर्तावर श्रीरामचंद्राच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये मोदी यांच्यासाठी ‘अभिजित’ मुहूर्ताचे ३२ सेकंद हे खूप खास असणार आहेत. पाच ऑगस्टला दुपारी १२ वाजून १५ मिनिटे आणि १५ सेकंदानंतर बरोबर ३२ सेकंदात पहिली वीट ठेवणे बंधनकारक आहे.

काशीचे प्रख्यात ज्योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी भूमिपूजन मुहूर्ताबरोबरच संपूर्ण कुंडली बनवली आहे.भाद्र पक्ष आणि अस्थिर तुळ लग्नदोषाला समाप्त करण्यासाठी या काही सेकंदाच्या मुहूर्ताचे खास महत्व असेल.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे स्वतः भूमिपूजन विधीची तयारी पहात आहेत. राममंदिराच्या गर्भगृहात भूमीपूजनासाठी लग्न, ग्रह, तिथी-वार याविषयी सोशल मीडियामध्ये आणि देशाच्या विद्वानांमध्ये खूप चर्चा सुरु आहे.

दरम्यान, ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास  सांगितले की काशीचे प्रख्यात बुजुर्ग ज्योतिषाचार्य  आणि श्री वल्लभ राम शालिग्राम, सांग वेद विद्यालयाचे व्यवस्थापक गणेश शास्त्री द्रविड यांनी श्री रामजन्मभूमीच्या गर्भगृहात 5 ऑगस्टला भूमिपूजनाचा मुहूर्त आणि कुंडली तयार केली आहे.

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र यांना दुपारी 12 वाजू   15 मिनिट आणि 15 सेकंदा नंतर 32 सेकंदाच्या आत गर्भगृहात पहिली वीट ठेवावी लागेल. 40 किलो वजन असलेली हे चांदीची वीट स्वत: ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास त्यांच्यावतीने पंतप्रधानांकडे देतील.

विश्व हिंदू परिषदेच्या कारसेवकपुरम येथील वेद विद्यालयाचे प्राचार्य, पूजा कार्याचे संयोजक आचार्य इंद्रदेव शर्मा यांचे म्हणणे आहे की ज्योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड एक महान विद्वान आहेत. भूमिपूजनाच्या वेळी  अभिजित मुहूर्त आहे. परंतु, तुळ राशी अस्थिर आहे. अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी 32 सेकंदांचा हा खास सर्वार्थ सिद्धि योग शोधण्यात आला आहे. राम मंदिर अत्यंत भव्यदिव्या असेल  तसेच जगाला प्रकाशित करेल. येथे येणारे भाविक जन्मोजन्मीच्या पापातून मुक्त होतील.

असे होईल भूमिपूजन

महंत कमल नयन दास म्हणाले की, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून भूमिपूजनाची सुरुवात गणपती पूजेपासून होईल. त्यानंतर विधिवत पंचांग पूजन होईल. हे पूजन 11 काशी आणि अयोध्याच्या वैदिक विद्वान करतील. आचार्य इंद्रदेव यांनी सांगितले की दुसर्‍या दिवशी रामार्चा पूजा होईल, त्यासाठी वेगवेगळ्या विद्वानांची एक टीम असेल. ही पूजा सकाळी आठ वाजल्यापासून सहा ते सात तास चालेल. 5 ऑगस्ट रोजी वैदिक विद्वानांचे पथक पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी वेदी पूजन करून निश्चित केलेया मुहूर्ताच्या वेळेमध्ये भूमिपूजन करतील.

भूमिपूजनासाठी तीन फुटाचा पाया

भूमीपूजनासाठी गर्भगृहाच्या ठिकाणी साडेतीन बाय तीन फूट तीन फुटांचा पाया खोदला जाईल. या फाऊंडेशनमध्येच पाच विटा बसवून भूमिपूजन केले  जाईल. या पाच विटा नंदा, भद्रा, जया, रिक्ता  आणि पूर्णा या नावांच्या असतील, ज्याची पूजा केली जाईल. मंत्रोच्चारणा दरम्यान मंदिराच्या गर्भगृहाच्या स्थळी पायाभरणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तांब्याच्या कलशाची स्थापना करतील.

मंदिरातील भूमीपूजनासाठी वापरल्या जाणार्‍या या तांब्याच्या कलशात वैदिक परंपरेनुसार, गंगेच्या पाण्यासह सर्व तीर्थक्षेत्रांचे पाणी भरले जाईल. या कलशात,  हिरा, पन्ना, मलिक, सोने आणि चांदीचा समावेश औषधी पंचरत्न ठेवण्यात येईल. त्याचबरोबर पाताळ लोकांचा राजा शेषनागला प्रसन्न करण्यासाठी चांदीचा नाग-नागीण जोडा आणि भगवान विष्णूच्या अवताराचे प्रतीक असलेला चांदीचे कासव देखील या पायामध्ये स्थापित करण्यात येईल.

34 किलो चांदीच्या विटांचे दान

राम मंदिर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत आहेत. मंगळवारी अयोध्येत दाखल झालेल्या लखनऊमधील राम भक्तांनी मंदिर बांधण्यासाठी चांदीच्या 30 विटा दान केल्या. या सर्व विटांचे वजन 33.75 किलो आहे. लखनऊ इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिका्यांनी ट्रस्ट कार्यालयात चांदीच्या 30 विटा दान केल्या.

काय आहे अभिजित मुहूर्त?

बुधवार, ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहुर्तावर अद्भूत योगायोग जुळून आला आहे. तो म्हणजे अभिजित मुहुर्तावर श्रीरामांचा जन्म झाला होता, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजित नक्षत्र हे यशकारक मानले गेले आहे. सर्वांत शुभ मानल्या गेलेल्या मुहुर्तांपैकी अभिजित मुहूर्ताचा आठवा क्रमांक लागत असून, तो उत्तम फलदायी असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजित २८ वे नक्षत्र आहे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हे शुभ मानले गेले आहे. त्यामुळे अभिजित मुहुर्तावर भूमिपूजन होणे अत्यंत वैभवकारी मानले जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *