माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे पुण्यात निधन


पुणे – माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं आज सकाळी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी त्यांची ओळख होती. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.पुण्यात झालेल्या पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते.

पी.बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सावंत यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सराव सुरू केला. १९७३ मध्ये सावंत यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशीही केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.  साली निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी राहिले. ते वर्ल्ड प्रेस कौन्सिल (लंडन) आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष राहिले होते. देश बचाव आघाडी तसेच लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते.

अधिक वाचा  झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर- मुरलीधर मोहोळ

२००२  च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम केले. २००३ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते.त्यांनी २३ फेब्रुवारी २००५ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाचील आणि सुरेश जैन यांच्या आरोप ठेवण्यात आले होते. तर विजयकुमार गावित हे दोषमुक्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. यावरून विधानसभेत गदारोळ जल होता व नवाब मलिक आणि सुरेश जैन यांना राजीनामा द्यायला लागला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love