पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार?जिल्हधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु


पुणे—पुण्यातील कोरोनाच्या संकटाची परीस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळणारे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अचानक पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्याच्या जिल्हधिकारी पदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. सध्या चार जणांची नवे चर्चेत आहेत. कदाचित आज (सोमवार) रात्री उशिरापर्यंत नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हून नियुक्ती झाल्याने पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन कोरोनाच्या संकट काळात राम यांची बदली झाल्याने पुणे जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.    

अधिक वाचा  इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांना राजीनाम्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? -- प्रकाश आंबेडकर

 पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी सध्या राजेश देशमुख सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. राजेश देशमुख यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी काम केलं आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं नाव चर्चेत आहे. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचं नाव मागं पडलं असल्याचे बोलले जात आहे.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय वर्चस्व असलेला जिल्हा तर  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील अधिकार्याची या जागेवर वर्णी लागेल अशी शक्यता आहे. आपल्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांसाठी अनेक लोकप्रतिनिधींची फिल्डींग लावली. त्याचबरोबर अनेक इच्छुक जिल्हाधिकाऱ्यांची नेत्यांकडे लॉबिंग सुरु केलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love