देशात पाच हजार दलित महिला उद्योजक निर्माण करणार – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-देशभरामध्ये विविध उद्योग,व्यवसायात पाच हजार दलित महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी आज महिला दिनानिमित्त व्यक्त केला.

राष्ट्रीय एस.एसी हब व डिक्कीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित उद्योजक (व्हेडर) विकास कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील विविधी  उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजिकांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला यामध्ये मोनिका जगताप, अर्चना सोंडे, प्राजक्ता नखाते, स्नेहा सकटे, तन्वी लोंढे, सीमा उकिरंडे, पुष्पा जाधव, सुनीता खंडागळे, स्मिता कांबळे यांचा समावेश होता. यावेळी उल्का सादलकर ,राष्ट्रीय.एसी.एस टी.हबचे तरेश घोरमोडे ,अविनाश जगताप ,सीमा कांबळे ,निवेदिता कांबळे ,जयश्री नेटके,प्राजक्ता गायकवाड ,मानसी वाघमारे ,अनिल होवाले ,संतोष कांबळे, चित्रा उबाळे, यांच्यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी व महिला उद्योजक उपस्थिती होते.

 मिलिंद कांबळे म्हणाले की ,आज महिला उद्योजिकांना सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना तयार करीत आहे. त्या योजना सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य आज डिक्की ही संस्था करीत आहे.सरकारचे व त्यासंबंधी निगडीत कंपनी व संस्थांचे खरेदी धोरण हे महिलांसाठी 3% आहे व अनुसूचित जाती साठी 4% आहे तरी या धोरणाचा व योजनेचा फायदा नवीन उद्योजक व महिलांनी घेण्याचे आवाहन केले व त्याविषयी सविस्तर माहिती सर्वाना दिली .

सारा प्लास्ट उद्योग समूहाच्या संचालिका उल्का सादलकर या प्रसंगी म्हणाल्या की,आज महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे .त्यासाठी उदयोग विश्वातील संधी शोधून आपले कर्तृत्त्व सिद्ध करावे त्यामुळे  आपल्या कुटुंबाला मदत होईल शिवाय देशाच्या विकासात आपला हातभार लागेल त्यामुळे आता दलित महिलांनी डिक्की च्या सहकार्याने उद्योग व्यवसायात स्थान निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी महाराष्ट्रातील विविधी  उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजिकांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला यामध्ये मोनिका जगताप, अर्चना सोंडे, प्राजक्ता नखाते, स्नेहा सकटे, तन्वी लोंढे, सीमा उकिरंडे, पुष्पा जाधव, सुनीता खंडागळे, स्मिता कांबळे यांचा समावेश होता .

दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात माझगाव डॉक मुंबई, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, भारत इलकंट्रोनिक्स मुंबई ,अमुनिशन फॅक्टरी ,एन.पी.सी.एल यासारख्या कंपन्या तील प्रतिनिधींनी महिला उद्योजिकांना व्हेडर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .त्यांच्या उत्पादनाचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *