पायलट यांच्यानंतर कॉंग्रसचीही नरमाईची भूमिका, घरवापसीसाठी दरवाजे खुले


नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)–आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं देखील सचिन पायलट यांनी म्हटल्यानंतर कॉंग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतलेली दिसते आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी बुधवारी सांगितले की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या चुकांबद्दल माफी मागितल्यास काहीतरी तोडगा निघू शकतो. परंतु प्रत्येक गोष्टीला ठराविक मुदत असते.  दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर पायलट यांनी स्पष्ट केले आहे की ते भाजपमध्ये जाणार नाहीत.

पायलट यांच्या  विधानाबद्दल विचारले असता पांडे म्हणाले की देव त्याला सद्बुद्धी देओ. ज्या पक्षाने त्यांना सांभाळले, उभे केले आणि मोठे केले तो पक्ष त्यांच्याकडे एक जबाबदार नेता असल्याची अपेक्षा करत आहे. माझा त्यांच्यासाठी हाच संदेश आहे. अशोक गहलोत यांच्या सरकारला पाडण्याच्या कारस्थानात पायलट हात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.

अधिक वाचा  लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका - नरेंद्र मोदी

पायलट यांच्यासाठी अजूनही कॉंग्रेसमध्ये काही वाव आहे का असे विचारले असता ते म्हणाले की का नाही?  पाच दिवस वावच वाव होता. त्यानंतर पायलट यांच्यासाठी  अद्याप दरवाजे खुले आहेत का असे विचारले असता, दरवाजे नेहमीच खुले असतात कॉंग्रेस सरचिटणीस म्हणाले की दरवाजे नेहमीच खुले असतात अशी टिप्पणी त्यांनी केली.

पायलट यांनी आपली चूक स्विकारली आणि सरकार पाडण्याच्या कट रचल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर काय घडू शकते या प्रश्नावर ते म्हणाले की निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो. परंतु प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा असते. त्यांनी केलेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यास सर्वकाही घडू शकते असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे कॉंग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कॉंग्रेसने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सभापतींनी बुधवारी पायलट यांच्यासह १९    आमदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना शुक्रवारपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.  त्याचवेळी सचिन पायलट म्हणाले की, ते अजूनही कॉंग्रेसमध्ये आहेत आणि सध्या ते भाजपमध्ये जाणार नाहीत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love