का केलं चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)— राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केलं होतं.मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाटील यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल आज घुमजाव करीत असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं आहे.

पाटील यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर पाटील यांनी घुमजाव करत फडणवीस यांची जे म्हणणे आहे तेच माझे म्हणणे आहे असे सांगत घुमजाव केले.  माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपाच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं करायचं हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं.”

ते म्हणाले,  महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. त्यामुळे शिवसेनाच काय इतर दुसऱ्या कोणालाही आमचा सरकार स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव नाही,” असं यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *