प्रिया बेर्डे पाठोपाठ आता ही अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश


मुंबईराष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठी अभिनेत्री आणि इतर कलाकारांची रीघ लागली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी पुण्यात खासदार सुप्रिया यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानतर आता मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर याही राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत येण्यासाठी मराठी कलाकारांची रीघ – सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

अधिक वाचा  #Sharad Pawar Vs Ajit Pawar : समंजस मतदार योग्य निकाल देतील : शरद पवारांचा अजित पवारांना टोला

‘काकस्पर्श’ या चित्रपटातील सविता मालपेकर यांची भूमिका चांगलीच गाजली होती.  या चित्रपटातील   भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते.  १९८८ मध्ये आलेल्या ‘आई पाहिजे’ चित्रपटातून सविता यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसंच ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

शरद पवार साहेबांना कलेची आणि कलाकारांची जाण आहे. त्यांच्याविषयी आदर आहे. लॉकडाउनच्या काळात लोक कलावंतांना देखील राष्ट्रवादीनं मोठी मदत केली. तीन हजार लोक कलावंतांना प्रत्येकी ३००० रुपये मानधन दिलं गेलं होतं. त्यामुळं राजकारणात येण्यासाठी राष्ट्रवादीची निवड केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं होतं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love