एलजीचा LG Aristo 5 स्मार्टफोन अमेरिकेत लॉन्च


ऑनलाईन टीम—एलजी या प्रख्यात कंपनीने अमेरिकेमध्ये आपला LG Aristo 5 हा आकर्षक स्मार्टफोन  लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3,000 एमएएच बॅटरी, एचडी डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दोन कॅमेरे मिळाले आहेत. दरम्यान, एलजी कंपनीने अद्याप  LG Aristo 5 भारतासह इतर देशांमध्ये लॉन्च करण्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

LG Aristo 5 ची किंमत

कंपनीने LG Aristo 5 या दोन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 150 डॉलर (सुमारे 11,300 रुपये) ठेवली आहे. हा स्मार्टफोन सिल्व्हर कलर ऑप्शनसह खरेदी करता येतो.

LG Aristo 5 (स्पेसिफिकेशन)

LG Aristo 5  या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे,  ज्याचे रिजोल्यूशन 720×1,520 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडिया एमटी 6762 प्रोसेसर आहे. या व्यतिरिक्त, युजार्संना या डिव्हाइसमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळाला आहे, ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा पीडीएफ सेन्सर आणि 5-मेगापिक्सलची वाईड-एंगल-लेन्स आहे. तसेच या स्मार्टफोनला  5 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

अधिक वाचा  भारतीय शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांची अमेरिकन व्यावसायिकाकडून फसवणूक : मुखर्जी यांचे संशोधन चोरून व्यावसायिक अमेरिकन विद्यापीठाशी करार करण्याच्या तयारीत

LG Aristo 5 (बॅटरी)

एलजीने या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. या व्यतिरिक्त, युजार्संना या डिव्हाइसमध्ये 3,000 एमएएच बॅटरी मिळाली आहे, जी 10 तासांची बॅटरी बॅकअप देईल असा कंपनीने दावा केला आहे. LG Aristo 5 चे वजन 146 ग्रॅम इतके आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love