अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला खुलासा


कोल्हापूर(ऑनलाईन टीम)—राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे तर यूजीसीने परीक्षा घ्याव्यात असे निर्देश दिले आहे. याबाबत उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे तर युवा सेनेने सर्वोच्च नायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. मुलांच्या पालकांनी चिंता करू नये. कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरू करणार असल्याची घोषणाही  उदय सामंत यांनी रविवारी केली.

अधिक वाचा  समाज सशक्त करणाऱ्या कार्यास बळ देणे गरजेचे-सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सीमा भागात राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरू  करण्यात येणार असून शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी कोल्हापुरात दिली.  

 अंतिम वर्षाचं परीक्षांबाबत बोलताना सामंत म्हणाले, राज्य सरकारला परीक्षाच घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. राज्य सरकारने दोनदा निर्णय घेतला होता. अंतीम वर्षाच्या परीक्षा आताच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यातही सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही. अचानक कोरोनाचे संकट दूर होणार आहे का? असा सवाल देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला.

युजीसीने राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी कसे काय येऊन परीक्षा देतील, तेही युजीसीने सांगावं. राज्यातल्या सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबोट करू शकणार नाहीत, असही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

मी जीआर काढून मागे घेतले नाही

 मी एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो. मी 60 जीआर काढून ते मागे घेतले नाही. परीक्षांचं कुणीही राजकारण करू नये, विद्यार्थ्यांच्या भवित्यव्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत उदय सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love