३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या नृत्य स्पर्धा संपन्न !

Women's dance competition concluded in Pune Festival
Women's dance competition concluded in Pune Festival

३५ व्या पुणे फेस्टिव्हलमधील महिला महोत्सव अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाल्या.यास्पर्धेत एकल गटात १८ ते ३५ वर्षे वयोगटात स्नेहल साधू(प्रथम क्रमांक) अवंती जोशी (द्वितीय क्रमांक) शुभांगी फंड (तृतीय क्रमांक) एकल गटात  ३६ ते ५० वर्षे वयोगटात पल्लवी लोंढे (प्रथम क्रमांक) निवेदिता बडवे(द्वितीय क्रमांक), सुप्रिया संत (तृतीय क्रमांक)समूह नृत्य स्पर्धेत भावना डान्स ग्रुप (प्रथम क्रमांक) , नुपूर डान्स अकादमी (द्वितीय क्रमांक) लास्य नृत्यालय (तृतीय क्रमांक) यांना पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी, स्पेशल चाइल्ड दिया जासूद यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


प्रारंभी संयोजक संयोगिता कुदळे व दीपाली पांढरे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, प्रमुख पाहुणे पल्लवी शिवकुमारश्री, चेतना बिडवे, प्राची कुलकर्णी (साम रिपोर्टर), परीक्षक ओंकार शिंदे व निखिल निगडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.
 
या स्पर्धेमध्ये १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्ष अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणारी ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडली .  कार्यक्रमात फ्युजन बॉलीवूड, कथक, ओडीसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारीत नृत्ये सादर झाली. या स्पर्धेतील एकल नृत्य स्पर्धेसाठी दोन्ही वयोगटात ३२ महिला आणि १८-५० या ग्रुप मध्ये समूह नृत्यसाठी १२ ग्रुप्सनी भाग घेतला होता. या नृत्य स्पर्धेचे परीक्षण नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे व निखिल निगडे यांनी केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले.

याप्रसंगी अॅड. अमृता जगधने,  रवींद्र दुर्वे,कमिटी प्रमुख  अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे उपस्थित होते.

अधिक वाचा  गुरूपूजन व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर्स, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love