पर्यटन बितले जिवावर : कार धरणात बुडून महिलेचा मृत्यू ; पती आणि मुलगा बचावले


पुणे-15 ऑगस्टच्या सुटीच्या निमित्ताने पानशेत धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. या कुटुंबाच्या चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रन सुटल्याने ती गाडी थेट धरणात बुडाली. त्यामध्ये या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा यांच्या सावधानतेमुळे ते वाचले.

काल १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने शनिवार पेठेत राहणारे योगेश देशपांडे हे पत्नी समृद्धी आणि मुलासोबत सकाळी पानशेतच्या दिशेने कारने फिरण्यास गेले होते. दुपारी पानशेतहून पुण्याकडे येत असताना त्यांच्या चारचाकी गाडीचं टायर फुटलं आणि त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण, कार थेट पानशेत धरणात बुडाली. गाडी चालवत असलेले योगेश आणि समोर बसलेला त्यांच्या मुलाने परिस्थिती पाहून लगेच गाडीच्या बाहेर उडी घेतली.

अधिक वाचा  टीईटी घोटाळा : संख्या जास्त असल्याने शासनाला अहवाल सादर करणार - पोलिस आयुक्त

दरम्यान, गाडी धरणात बुडाली आहे, हे पाहून रस्त्याच्या शेजारी असलेले नागरिक मदतीला धावले. त्यांनी योगश देशपांडे आणि त्यांच्या मुलाला धरणाच्या बाहेर काढलं. शेजारच्या हॉटेलमधील एकाने पाण्यात उडी घेत कारच्या टायरला दोरी बांधून झाडाला बांधली. ज्यामुळे कार पूर्णपणे पाण्यात बुडाली नाही. यावेळी समृद्धी यांना बाहेर काढताना त्यांना अडचणी आल्या. कारच्या मागची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. समोरच्या खिडक्या उघडल्या असल्यानं योगेश आणि त्यांचा मुलगा लगेच बाहेर आले. पण मागच्या खिडक्या बंद असल्याने समृद्धी बाहेर पडू शकल्या नाहीत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love