वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोनाव्हायरस साथी विरुद्ध लढण्यासाठी देशात मास्क घालणे सक्तीचे करणार असल्याची घोषणा केली आहे.
जो बिडेन म्हणाले की, आपली १०० दिवसांची योजना आखताना आपण आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी मास्क घालण्यासाठीच्या जनादेशावर स्वाक्षरी करणार आहे.
बिडेन आपल्या प्रशासनातील प्रमुख आरोग्य सल्लागारांची ओळख करून देताना म्हणाले कि, मला पूर्ण खात्री आहे की १०० दिवसांत आपण या रोगाची दिशा बदलू शकतो आणि अमेरिकेतील जीवन बदलू शकतो. त्यामुळे माझे पहिले १०० दिवस मी मास्किंग प्लॅन मागणार आहे.
सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ठिकाणांवर जनादेशाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच राज्यांना स्वत:च्या अधिकार क्षेत्रात मास्क सक्तीचा करण्याचा अधिकार आहे, असल्याचे ही जो बिडेन म्हणाले.
Newscorps Wire Services