High profile prostitution busted

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकी तरुणींची सुटका

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

High profile prostitution business : पुणे शहरातील(Pune City) विमाननगर(Vimannagar) परिसरात एका उच्चभ्रू हॉटेलमधील सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा (High profile prostitution business) पुणे गुन्हे शाखेच्या(Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकून पर्दाफाश केला आहे. याकारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह (Rajasthani actress ) उझबेकिस्तानमधील (Uzbekistan) दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानगर पोलीस ठाण्यात(Viman nagar Police Station) इरफान(Irphan) उर्फ राहुल मदन(Rahul Madan) उर्फ मदन संन्यासी(Madan Sanyasi) आणि रोहित(Rohit) (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार(Pitta Law) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(High profile prostitution busted)

विमाननगरमधील निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पथकाने हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.  हॉटेलमधील दोन रुममध्ये छापा टाकून उझबेकिस्तान आणि राजस्थानमधील  तरुणींना ताब्यात घेतले. सुटका केलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याचे उघडकीस आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  पोलीस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अनिकेत पोटे, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक आश्विनी भोसले, पोलिस राजेंद्र कुमावत, सागर केकाण, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, ओंकार कुंभार, रेश्मा कंक, हनुमंत कांबळे, अजय राणे, बाबा कर्पे, किशोर भुजबळ यांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *