gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Thursday, July 3, 2025
  • जाहिरातीसाठी संपर्क
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ महत्वाच्या बातम्या म्हणून भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला .. अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले
  • महत्वाच्या बातम्या
  • राजकारण

म्हणून भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला .. अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

प्रतिनिधी
News24Pune
-
June 10, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    बेरजेच्या राजकारणातून भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय
    बेरजेच्या राजकारणातून भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय
    Spread the love

    Post Views: 3,217

    पुणे (प्रतिनिधी) — केवळ विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही, आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचे राजकारण (Politics of Addition) करणारे लोक आहोत. याच बेरजेच्या राजकारणातून आपण भाजपा (BJP) आणि एनडीएबरोबर (NDA) जाण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील (Pune) बालेवाडी क्रीडा संकुलात (Balewadi Sports Complex) आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) दारुण पराभव, ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यामागील कारण आणि भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) (Bharatiya Janata Party) (महायुती) (Mahayuti) जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अजित पवार यांनी प्रथमच अत्यंत स्पष्टपणे आपले मत मांडले.

    बहुमताचा अभाव आणि आघाडीचे राजकारण अजित पवार यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनेच्या दिवसाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मला आजही १० जून १९९९ (June 10, 1999) हा दिवस आठवतो. शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली”. आपल्या पक्षाला राज्यात कधीही बहुमत मिळाले नाही हे मान्य करावे लागेल. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावे लागले, कारण आता राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. केंद्रातही यूपीए (UPA) किंवा एनडीए (NDA) यांसारख्या आघाड्या कराव्या लागल्याचे उदाहरण त्यांनी दिले. “सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

    अधिक वाचा  हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा : विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

    भाजपासोबत जाण्यामागील कारण आणि ‘बेरजेचे राजकारण’ भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत बोलताना ते म्हणाले, “२०१९ (2019) साली आपल्या पक्षाने शिवसेना (Shiv Sena) पक्षाबरोबर सरकार स्थापन केले होते. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या”. “शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचे राजकारण करणारे लोक आहोत आणि याच बेरजेच्या राजकारणातून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही एकेकाळी एनडीएला साथ दिल्याची उदाहरणे त्यांनी दिली. राज्याचा विकास झाला पाहिजे हेच आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

    अधिक वाचा  'ट्रॅव्हल विथ जो' फेम युट्युबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक : कोण आहे ज्योती मल्होत्रा?

    लोकसभेतील पराभव आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा जन्म अजित पवारांनी, लोकसभेत आपला दारूण पराभव झाल्याचेही मान्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत आपला ७५ टक्के पराभव झाला. आपली फक्त एक जागा निवडून आली असे आकडेवारीसह त्यांनी सांगितले. या पराभवानंतर आपण कुठे कमी पडलो, काय चुकले यावर विचार केला. याच आत्मचिंतनातून ‘लाडकी बहीण’ योजना पुढे आली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

    ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, दर महिन्याच्या शेवटी आदिती (Aditi) त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे द्यायचे असल्याचे सांगायची. या योजनेसाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपये लागतील, असा मोठा आर्थिक विचार करण्यात आला आहे, जेणेकरून महिलांच्या हातात पैसे मिळतील. विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरून आरोपांना प्रत्युत्तर सामाजिक न्याय विभागाचे (Social Justice Department) बजेट कमी केल्याचा आरोप आपल्या सरकारवर होत असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले. या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विचारू शकता. यंदाचा ७ लाख २० कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर करताना महायुतीने मागच्या बजेटपेक्षा अनुसूचित जातीला (Scheduled Castes) ४१ टक्के निधी वाढवून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आदिवासी विभागालाही (Tribal Department) ४१ टक्के निधी वाढवून दिल्याची माहिती त्यांनी दिली, परंतु ही माहिती सर्वांसमोर येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

    अधिक वाचा  विवाह पद्धतीत आमूलाग्र बदल आणि सुनेचा छळ करणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार : मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

    मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का? निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पैशांचं सोंग करता येत नाही, हे मी नेहमीच सांगतो. “राज्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली पाहिजे. त्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात”. “पण कधीकधी बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाही. मग मी काय पैसे खिशात घेऊन बसतो का?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.

    अजित पवार यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम करण्याची ग्वाही दिली. काही जण जाणीवपूर्वक सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव (Shivaji Maharaj), शाहू (Shahu Maharaj), फुले (Jyotirao Phule), आंबेडकर (B. R. Ambedkar) यांच्या विचाराने चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

    Like
    50% LikesVS
    50% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • अजित पवार (Ajit Pawar)
    • पुणे (Pune)
    • बेरजेचे राजकारण (Politics of Addition)
    • भाजप (BJP)
    • महायुती (MahaYuti)
    • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
    • लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)
    • लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election)
    • विधानसभा निवडणूक (Assembly Election)
    • शरद पवार (Sharad Pawar)
    • सामाजिक न्याय विभाग (Social Justice Department)
    मागील बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के महिलांना संधी देणार : शरद पवार
    पुढील बातम्या जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत : शरद पवार यांचा तूर्तास थांबण्याचा सल्ला
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    पुणे-मुंबई

    राज्य बँकेच्या ‘सहकार भक्ती-रथाचे’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात लोकार्पण

    शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे आणि सन्मानाचे क्षण
    पुणे-मुंबई

    झाले मोकळे आकाश……. : शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे आणि सन्मानाचे क्षण

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
    महत्वाच्या बातम्या

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग १३ )

    Follow Us

    [slide-anything id=”13045″]

    राज्य बँकेच्या ‘सहकार भक्ती-रथाचे’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात लोकार्पण

    July 3, 2025
    शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे आणि सन्मानाचे क्षण

    झाले मोकळे आकाश……. : शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे...

    July 2, 2025
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग १३ )

    July 2, 2025
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

    July 2, 2025
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग १२ )

    July 1, 2025
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: [email protected]

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Encroachment action by railway administration in Bhushi Dam area

    भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई : शेकडो कुटुंब रस्त्यावर 

    July 2, 2024
    798 mm of rain in Lonavala in 3 days

    3 दिवसांत लोणावळ्यात तब्बल 798 मिमी पाऊस : पूरस्थितीमुळे पर्यटकांना पर्यटनाकरिता...

    July 25, 2024

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई1865
    • राजकारण1255
    • महाराष्ट्र705
    • महत्वाच्या बातम्या581
    • क्राईम376
    • शिक्षण197
    • लेख179
    • आरोग्य133
    • देश-विदेश118
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    महत्वाच्या बातम्या

    म्हणून भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला .. अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

    by News24Pune time to read: <1 min
    महत्वाच्या बातम्या जयंत पाटील यांचे प�…
    महत्वाच्या बातम्या स्थानिक स्वराज्य स…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी
    Coromandel International S. Sankarasubramanian promoted as MD & CEO

    कोरोमंडल इंटरनॅशनलने एस. शंकरसुब्रमण्यन यांना एमडी आणि सीईओ म्हणून दिली...

    August 9, 2024
    MAEER'S FOUNDATION DAY CELEBRATED THROUGH BLOOD DONATION

    MIT-ADT University Hosts Life-Saving Blood Donation Campaign on 42nd Foundation Day...

    August 6, 2024
    ×

    No WhatsApp Number Found!

    WhatsApp us