‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’: सर्वोत्कृष्ट गायक सुझी मॅथ्यू व करणसिंह चौहाण

Voice of Pune Festival
Voice of Pune Festival

पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धेत सुझी मॅथ्यू  सर्वोत्कृष्ट गायिका व करणसिंह चौहाण सर्वोत्कृष्ट गायक ठरले. तसेच पुणे फेस्टिवल फिरता करंडक’ डॉ. डी वाय पाटील, एसीएस कॉलेज यांनी पटकावला. कॉलेजतर्फे संगीत विभागाच्या प्रमुख प्रा. अनिता सुळे आणि  सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या जल्लोषात हा करंडक स्विकारला.

३५ व्या  पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ या तेराव्या सुगम संगीत स्पर्धेचे  उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे दि २५ रोजी सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश चंद्रचूड व विश्वजीत जोशी आणि  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते झाले.  ज्येष्ठ गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर,  सुप्रसिद्ध संगीतकार साई निंबाळकर व पियुष कुलकर्णी आणि  गझल गायक डॉ. अविनाश वाघ यावेळी उपस्थित होते. याचे संयोजन अनुराधा भारती यांनी केले होते.

अधिक वाचा  बाजार समित्यांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध करुन शेतकरी हितासाठी काम करावे - पणनमंत्री बाळासाहेब पाटील

 ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा असून वय वर्ष ४० च्या आतील व ४० च्या पुढे, महिला व पुरुष अशा चार वयोगटात स्पर्धा घेतली गेली. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती करंदीकर, गझल गायक डॉक्टर अविनाश वाघ व ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले असून प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीने अंतिम फेरीसाठी परिक्षक  म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेत ४०० हून अधिक गायक – गायिका आणि अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता त्यांची प्राथमिक  फेरी झाल्यानंतर अंतिम फेरी काल  संपन्न झाली.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :


१. ‘अ’ गट मुली (४० वर्षे खालील)  :- प्रथम परितोषिक विजेती

अधिक वाचा  रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी - चंद्रकांतदादा पाटील : रोटरी क्लब ऑफ गांधी भवनच्या वतीने आयोजित कोथरूड शॉपिंग फेस्ट सुरू

सुझी मॅथ्यू मुंबई व द्वितीय परितोषिक विजेती श्रेया गंधे, स.प. महाविद्यालय

२.’बी’ गट (४० वर्षे पुढे) प्रथम परितोषिक विजेती महीला रूपलेखा हेगडे (मूळची आसाम)

द्वितीय परितोषिक विजेती महिला प्रीती गोरे

३.’सी’ गट मुले (४० वर्षे खालील) : प्रथम परितोषिक विजेता

करणसिंह चौहाण, एम आय टी कॉलेज,

‘सी’ गट द्वितीय परितोषिक विजेता यश निरालगी, स. प. महाविद्यालय

४.’डी’ गट (४० वर्षे पुढे ) : प्रथम परितोषिक विजेता पुरुष शंतनु पंचपोर

व द्वितीय परितोषिक विजेता पुरुष नितीन कुलकर्णी.

५. युग लगीच स्पर्धेमध्ये क्रमांक दीपक कुलकर्णी व विणा जोगळेकर यांनी पटकावला.

उत्तेजनार्थ बक्षीस सोलो कॅटेगिरीमध्ये विजय खापेकर यांना व युगलगीतामध्ये किशोरी तांबोळी व उमेश पेडगावकर यांना देण्यात आले.

अधिक वाचा  भाजपचे संकल्पपत्र 'विकसित भारता'चा रोड मॅप -माधव भांडारी

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर्स, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love