वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे -स्वामी गोविंददेव गिरी महाराज : भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार प्रदान

वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे
वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे

पुणे(प्रतिनिधी)– भारतीय संस्कृति ही वेदमूलक आहे. यामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या उपासनेतूनच एक दिवस भारत माता विश्वगुरू होईल. खरंतर वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री राहिलेले अशोक सिंघल हे ख-या अर्थाने वेदोपासक होते, असे गौरवोद्गार अयोध्या श्री राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले.

विश्व हिंद परिषदेचे संस्थापक सदस्य तथा श्री रामजन्म भूमि आंदोलनाचे अग्रणी अशोक सिंघल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. याच शृंखलेत २०२५ चे पुरस्कार सोमवार १७ नोव्हेंबर २०२५ रोजी बीएमसीसी रोडवरील दादासाहेब दरोडे सभागृहात वितरित करण्यात आले. उत्कृष्ट वेद विद्यार्थी श्रेणीतील पुरस्कार हैदराबाद येथील श्री नोरी केदारेश्वर शर्मा, चेन्नईचे श्री अनंत कृष्ण भट्ट यांना आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथील श्री दत्तात्रेय वेद विद्यालयाला यांना तीन लाख, पाच लाख आणि सात लाख रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य श्री प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर सिंघल फाऊंडेशन मार्गदर्शक रवींद्र मुळे, सिंघल फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त संजय सिंघल आणि सलिल सिंघल उपस्थित होते.

अधिक वाचा  देशातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभारावित-आचार्य गोविंद देवगिरी महाराज

कलाकार, खेळाडू आणि साहित्यिक यांचा या समाजात नेहमीच सन्मान केला जातो. मात्र , वेदांचे जतन आणि प्रचार करणाऱ्या वैदिक विद्वान वैदिकांचा मात्र विचार होत नाही. वैदिक विद्वान सर्वात जास्त काम करतात. म्हणूनच, भविष्यात वैदिक विद्वानांचा आदर करणे आवश्यक आहे. वैदिक विद्वान हे राष्ट्रीय कार्य करत आहेत. म्हणून, वैदिक विद्वानांचा आदर करणे म्हणजे राष्ट्राचा आदर करणे आहे. ही भावना गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये वेद आणि वेदिक धर्माचे महत्व वाढले आहे, परंतु त्याची पुनर्प्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे. अशा स्थितीत जे लोक वेदांचा प्रचार करीत आहेत, त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे काम सिंघल फाउंडेशन करीत आहे, हे नक्कीच समाधानकारक आहे. कारण यातूनच वेदिकतेच्या सन्मानाची परंपरा मजबूत होईल.

अधिक वाचा  झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची रेकी करुन घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक : ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना परमपूज्य आचार्यजी श्री प्रद्युम्नजी महाराज म्हणाले की, वेद आम्हाला कर्म शिकवतात आणि तेही निष्काम कर्म.आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून समाजात केवळ ज्ञानाला प्रवाहित करणे हे खरे वेद कर्म आहे. यातूनच वेदोपासकसुद्धा अंतर्बाह्य प्रकाशमान होत असतो. वेद आत्मसात करणे म्हणजे वेदांना समर्पित होण्यासारखे आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शास्त्र वचनांचे पालन आणि सोबतच गुरू वचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजय सिंघल म्हणाले की, अशोक सिंघल यांचे जीवन वेद आणि राम मंदिर संघर्षाची गाथा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सिंघल फाउंडेशनने वेद प्रसारासाठी काम करणा-यांचा सन्मान व्हावा यासाठी या पुरस्कारांची संकल्पना मांडण्यात आली. जेंव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर हा विषय मांडला, तेंव्हा त्यांनी या पुरस्काराचे नाव भारतात्मा असे सुचवले. याच नावाने अशोक सिंघल यांच्या कार्याला सुरू ठेवण्यासाठी हे पुरस्कार भविष्यात निरंतरपणे वितरित केले जातील.

अधिक वाचा  कौशिक आश्रमच्या शिबिरात ३८४ जणांचे रक्तदान

कार्यक्रमात सुरवातीला वेद वंदना आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पुरस्कारासाठी जूरी म्हणून काम करणा-यांचाही सत्कार गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम शर्मा यांनी केले आणि संजय सिंघल ने उपस्थित सर्वांचे आभार प्रकट केले.

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love