‘वंचित’कडून एसटी डेपो व सार्वजनिक बस डेपो समोर राज्यभर डफली बजाव आंदोलन

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

‘वंचित’कडून एसटी डेपो व सार्वजनिक बस डेपो समोर राज्यभर डफली बजाव आंदोलन

https://news24pune.com/vanchit-bahujn-aghadi-:-statewide-dafali-bajaw-agitation-in-front-of-st-depot-and-public-bus-depot/

पुणे– केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उद्या ( १२ ऑगस्ट) राज्यभर राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी  केली आहे. Vanchit Bahujn Aghadi : Statewide Dafali  Bajaw agitation in front of ST Depot and Public Bus Depot  

आम्ही वंचितांचे नेतृत्व करतो आहोत. लॉकडाऊनमुळे जनतेचे हाल होत आहेत.  राज्यात दुकानांसाठी सुरु केलेला सम-विषम तारखेचा नियम कधी बंद करणार?, टपरीवाले आणि फेरीवाले यांची उपासमार होत आहे त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी कधी देणार?, एस.टी. महामंडळाच्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहेत त्यांना दोन महिन्याचे पगार नाहीत, एस. टी. रस्त्यावर कधी धावणार?, मनपाची सार्वजनिक वाहतूक कधी सुरु होणार, हे सर्व सरकारने सांगावे, हे जर सरकार सांगणार नसेल तर वंचित बहुजन विकास आघाडी १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ६ ऑगस्ट रोजी दिला होता. मात्र, राज्य शासनाकडून त्यांच्या या मागणीची दखल न घेतल्यामुळे उद्या डफली बजाव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

 हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलं आहे.  

या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *