राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला बीएमडब्ल्यू चालकाची जबर मारहाण


पुणे-राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या 23 वर्षीय वैष्णवी ठुबेला बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने हडपसर परिसरात सिग्नलला गाडी पुढे घेण्याच्या वादातून जबर मारहाण केली आहे.  कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुमित टिळेकरने दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली. दरम्यान, अशा उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वैष्णवी ठुबे तिच्या वहिनीसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बीएमडब्ल्यू कार चालक सुमित टिळेकर वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगाने जात होता. सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या वैष्णवीच्या वहिनीच्या पायाला गाडीचा धक्का लागला. त्यावेळी वैष्णवीने सुमितला गाडी हळू चालवा, असा विनंतीवजा सल्ला दिला.

अधिक वाचा  का भडकले अजित पवार मनसेच्या नगरसेवकावर? काय म्हणाले नगरसेवक?

आपल्याला कार हळू चालवण्यास सांगितल्याचा राग अनावर होऊन सुमित टिळेकरने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर हडपसर परिसरात फातिमानगर चौकात कार थांबवून त्याने लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये वैष्णवी ठुबेच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

वैष्णवी म्हणाली, “मी हातही उचलला नव्हता, ते बाहेर येतानाच डायरेक्ट बांबू घेऊन मला मारहाण करायला लागले. तो फटका माझ्या डोक्यावर बसला असता, पण मी माझा बचाव करुन घेतला. हात मध्ये घातल्याने हाताला दुखापत झाली आहे. मी ज्युडो आणि कुस्ती खेळते. या घटनेमुळे माझ्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे.”

मनसेच्या रुपाली पाटील म्हणाल्या, “ती मुलगी खेळाडू असल्याने तिने तो मार सहनही केला. पण आर्मी भरती असो किंवा तिचे पुढील सामने, हात तुटल्यामुळे तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तुम्ही उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिला आहे.

अधिक वाचा  आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका- राज्यपाल कोश्यारी

मारहाणीत वैष्णवी ठुबे हिचा हात फ्रॅक्चर झाला असूनही या प्रकारात वानवडी पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी या संदर्भात गंभीर मारहाणीचं कलम वाढवलं. त्यामुळे वानवडी पोलिसांच्या विरोधात वैष्णवी ठुबेने आक्रमक भूमिका घेत आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचे 307 कलम लावावं, अशी मागणी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love