#वैष्णवी हगवणे खून प्रकरण :अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको : अजित पवार

अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको : अजित पवार
अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको : अजित पवार

पुणे(प्रतिनिधि)– लोक प्रेमापोटी बोलावतात म्हणून लग्नाला जावं लागतं. नाही गेलो तरी माणसे रुसतात. शक्य असेल तेवढे आम्ही करतोच ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का की तुम्ही सुनेसोबत असे वागा म्हणून?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे शंकास्पद मृत्यू प्रकरणावरून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान, “आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद होता. त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी हकालपट्टी केलेली आहे. अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको,”असे ते म्हणाले.

मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची ती सून होती.  वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा झाला असून, वैष्णवीचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हुंड्यासाठी छळ आणि सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून, सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  आंबवणेचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची शासनाने चौकशी करावीः ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

या घटनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल होणाऱ्या वारंवार उल्लेखावरुन अजित दादा यांनी एका कार्यक्रमात बोलताना माध्यमांवर तीव्र शब्दांत टीका केली.  घडलेला प्रसंग उपस्थितांना स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले, “मी तुम्हाला घरचा माणूस समजून सांगतो, माझी भूमिका काय आहे ते बघा. अनेकदा तुम्ही मला लग्नसमारंभांसाठी बोलावता आणि शक्य असेल तेवढा मी जाण्याचा प्रयत्न करतो, अगदी उशिरा का होईना. समजा मी एखाद्याच्या लग्नाला गेलो आणि  त्यांच्या सुनेसोबत काहीतरी गैरप्रकार घडला, तर त्यात अजित पवारांचा काय संबंध? अजित पवारांनी जायला सांगितले म्हणून त्याने असे कृत्य केले का? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद घटनेची माहिती मिळताच तात्काळ पिंपरी-चिंचवड आयुक्तांशी संपर्क साधून कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. “कुणीही असो, त्याच्यावर कारवाई करा असे मी त्यांना सांगितले. आता त्या मुलीने आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये आणि तिचा नवरा साताऱ्याला पळाला. पळून पळून कुठे जाणार? मी आजही सांगितले आहे की त्यांनी तीन टीम सोडल्या आहेत, तीन नाही तर सहा टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा असे मी सांगितले आहे,” असे पवार म्हणाले.

अधिक वाचा  कोरोनाच्या संकटाची दाहकता 'रेडलाईट एरिया'पर्यंत: सांगा कसे जगायचे?

मात्र, या प्रकरणात काही टीव्ही चॅनल सतत “अजित पवार, अजित पवार” असे ओरडत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अरे, माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक आहोत.   लोक प्रेमापोटी बोलावतात म्हणून जावं लागतं. नाही गेलो तरी माणसे रुसतात. शक्य असेल तेवढे आम्ही करतोच ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का की तुम्ही सुनेसोबत असे वागा म्हणून?” असा सवाल त्यांनी केला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहिल्याचे सांगताना पवार म्हणाले, “मीच तर माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायच्या लालनी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस, आता बचत गटाबद्दल आणि बाकीच्याबद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मंत्री असलेल्या मुलीने चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो, असे ते म्हणाले. जर अजित पवार तिथे दोषी असतील तर अजित पवारांना फासावर लटकवा, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण उगीचच माझी बदनामी करू नका. मीडियाला अधिकार दिला आहे म्हणून मोकळी सूट नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  पवारांनी शेताच्या बांधातच रहावं; शेजारचा देवाचा बांध रेटू नये- माधव भांडारी

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love