दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार : तिघांना अटक

दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार
दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार

पुणे(प्रतिनिधि)–बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील एका खोलीत दारू पाजत सामूहीक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून एक फरार आहे.

ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) आणि यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दिनांक १४ सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या १४ सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले.

अधिक वाचा  नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीसांकडून काेबिंग ऑपरेशन: 414 गुन्ह्यात 443 आराेपींना अटक

मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले.

१६ तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणलं. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे.

अधिक वाचा  राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे- पंकजा मुंडे

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love