‘तू सौभाग्यवती हो’:सूर्यभान अल्लड ऐश्वर्याला बायकोचा दर्जा देऊ शकेल का?


पुणे–सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो‘ ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या  आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे लग्न होतंय. सूर्यभान हा विधुर आहे आणि तो आपल्या पहिल्या  पत्नीची  जागा कोणालाच देऊ शकत नाही असं त्याच ठाम मत आहे आणि करारी पण मनानी निर्मळ असणाऱ्या माणसाशी संसार करणं ही ऐश्वर्यासाठी पण तारेवरची कसरत आहे. हा विवाह सप्ताह १ जूनपासून सुरू होणार आहे. अल्लड ऐश्वर्या सुर्यभानची बायको, बायजींची सून आणि सुर्यभानच्या मुलांची आई बनून जाधवांच्या वाड्यात येईल तेव्हा नेमकं काय होईल? सूर्यभान तिला बायकोचा दर्जा देऊ शकेल का? मुलं तिला आपलं म्हणतील का हे सगळं पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.

अधिक वाचा  इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले..

वयाने लहान आणि स्वभावाने अल्लड असली तरीही ऐश्वर्या जाधवांच्या घराला आणि सूर्यभानला सांभाळू शकेल अशी खात्री बायजींना तिच्याबद्दल आहे. तिचे समंजसपणा, हुशारी आणि वेळ पडली तर कोणत्याही संकटाला तोंड द्यायची तयारी बायजींनी स्वतः पाहून तिची निवड केली आहे.

 या आगळ्या वेगळ्या लग्नाचा थाट पण तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love