वाघाची कातडी विकणारे रॅकेट उद्ध्वस्त : पुणे सीमा शुल्क विभागाने केली वाघाची 5 कोटींची कातडी जप्त

वाघाची कातडी विकणारे रॅकेट उद्ध्वस्त
वाघाची कातडी विकणारे रॅकेट उद्ध्वस्त

पुणे(प्रतिनिधि)– वाघाच्या कातडी विक्रीचे मोठे रॅकेट पुणे आणि नागपूर सीमाशुल्क विभागाने उद्ध्वस्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कातडय़ाची किंमत तब्बल ५ कोटी रुपये असून, याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, तस्करांनी वाघाची शिकार करण्यासाठी जंगलातील वनगाईला विष खायला घालून तिचे मांस वाघाला खाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्यानंतर कातडे काढून विक्रीचा डाव रचल्याचे उघडकीस आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे यशोधन वणगे यांनी दिली आहे.

अजवर सुजात भोसले (वय ३५),  रहीम  पारधी ( वय ४५ ), तेवाबाई पारधी (वय ४० ), काकनाबाई (वय ३०), ऩदीम शेख (वय २६),  मोहम्मद अथर खान  (वय ५८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जळगावजवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली. त्याचा तपास करण्यासाठी २६ जुलैला पुण्यातून पथक कारवाईसाठी जळगावमध्ये दाखल झाले. पथकाने केलेल्या कारवाईत दोन महिलांसह सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी रहीम पारधीची चौकशी केल्यानंतर त्याला यापूर्वीही वन विभागाने अटक केली होती, तर मोहम्मद खान हा भोपाळचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जळगाव भोपाळसह याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संबंध आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

अधिक वाचा  #हिट अँड रन' प्रकरण : दोन डॉक्टरांसह शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी  

 पूर्ण वाढ झालेल्या पाच फूट वाघिणीचे कातडे जप्त

ठार केलेली वाघीण चार ते पाच वर्षांची असल्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कातडीची किंमत ५ कोटी आहे. दरम्यान, वाघाच्या कातडीसह ६ आरोपींना कार्यक्षेत्र असलेल्या वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे आणि नागपूर सीमाशुल्क पथकाने केलेल्या कारवाईमुळे मोठय़ा तस्करीचा डाव उधळून लावला आहे. दरम्यान, पुणे कस्टम पथकाने सहा महिन्यांपूर्वी बिबटय़ाची कातडी जप्त केली होती, तर महिन्याभरापूर्वी वाघाची कातडी जप्त केली होती.

 वनगाईला विष देऊन वाघाच्या तोंडी दिले

तस्करांनी जंगलातील वनगाईला विष देऊन ठार मारले. त्यानंतर संबंधित गाईचे मांस वाघाने खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तस्करांनी वाघाची कातडी काढून विक्रीचा डाव रचला होता. वाघाच्या कातडय़ाचा शोध पोलीस आणि सीमा शुल्क पथकाला लागू नये, यासाठी आरोपींपैकी एका महिलेने कातडे स्वतःच्या अंगावर लपेटून त्यावर साडी घातली होती.

अधिक वाचा  साथीदारांनीच केला गुंड शरद मोहोळचा गेम : आठ जणांना अटक

 

 

 

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love