श्री गणेश चतुर्थीला तब्बल 126 वर्षानंतर जुळून आला हा योग

अध्यात्म पुणे-मुंबई
Spread the love

कोरोनाच्या काळात कशी कराल श्री गणेशाची प्रतिष्ठापना?

पुणे—उद्या (दि. २२ ऑगस्ट) मांगल्याचा सण म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु हे वर्ष वेगळे आहे कारण यंदा जगात कोरोनाचे सावट आहे. कोविड-१९ विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांकडून सामाजिक अंतर राखले जात आहे. अशा परिस्थितीत आपण गणेशोत्सवाच्या सामूहिक कार्यक्रमात भाग न घेता स्वत: आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकता.

  श्री गणेशाच्या स्थापनेचा मुहूर्त

यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पंचांगानुसार तीन मुहूर्त दिले आहेत.

प्रथम शुभ वेळ – सकाळी 7.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत.

दुसरी शुभ वेळ – दुपारी 1:30 ते सायंकाळी 4:30

तिसरी शुभ वेळ – संध्याकाळी 6 ते 7.

126 वर्षानंतर जुळून आला हा योग

ज्योतिष शास्त्राच्या गणितानुसार यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. उद्या गणेश चतुर्थीला (22 ऑगस्ट) सूर्य सिंह राशीत असेल आणि मंगळ मेष राशीमध्ये असेल. हे दोन्ही ग्रह त्यांच्या स्वतःच्या राशि चक्रात असतील. गणेश चतुर्थीला, सूर्य आणि मंगळाचा हा योग तब्बल 126 वर्षानंतर जुळून आला आहे. यावेळी गणेशोत्सव चित्र नक्षत्रात होईल.

अशा विधिवत पद्धतीने करा श्री गणेशाची प्रतिष्ठापना  

सर्वप्रथम या मंत्राचा जप करा – अस्य प्राण प्रतिषठन्तु अस्य प्राणा: क्षरंतु च। श्री गणपते त्वम सुप्रतिष्ठ वरदे भवेताम।।

गणपती बाप्पांला आवाहन करण्याबरोबरच हा स्थापना मंत्र आहे.

पूजेचे साहित्य –

हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी १०, खारीक ५, बदाम ५, हळकुंड ५, अक्रोड५, ब्लाउज पीस १, कापसाची वस्त्रे, जानवी जोड २, पंचा १, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार १, आंब्याच्या डहाळे, नारळ २, फळे ५, विड्याची पाने २५, पंचामृत, कलश २, ताम्हण १, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

इतर तयारी –

१. गणेशाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशी आणून ठेवावी
२. मूर्ती मखरात ठेवावी, सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे
३. बसण्यासाठी आसन किंवा बेडशीट
४. घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे.
५. देवासाठी काहीही समर्पण करताना ते उजव्या हातानेच वाहावे.
६. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वाहावे
७. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. दुसऱ्या व्यक्तीने पूजा करावी

गणेशपूजा पद्धती –

१. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे.
२. देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा
३. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
४. आसनावर बसावे.
५. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे
६. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.
७. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.
८. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे
९. नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे
१०. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे
११. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे
१२. ताम्हणात ४ वेळा पाणी सोडावे
१३. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात
१४. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.
१५. प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात
१६. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे
१७. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.
१८. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे
१९. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी
२०. श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे

आणि शेवटी पूजेमध्ये कोणतीही कमतरता राहिली असेल किंवा काही चूक झाली असेल तर गणपती बाप्पाची क्षमा मागावी.

क्षमा प्रार्थनेसाठी या मंत्राचा जप करा

 गणेशपूजने कर्म यत् न्यूनमधिकम कृतम।

तेन सर्वेण सर्वात्मा प्रसन्न अस्तु गणपति सदा मम।।

या पद्धतीने आपण कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत साध्या परंतु धार्मिक विधीने श्रींची प्रतिष्ठापना करू शकता. त्यानंतर दहा दिवस गणपती बाप्पाची दररोज पूजा आणि आराधना करावी आणि त्यानंतर विधीनुसार विसर्जन करावे. असे केल्याने संकटे दूर होतील आणि विघ्नहर्त्याच्या आशीर्वाद प्राप्त करू शकाल.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *