news24PUNE ( Live Update )—अत्यंत चुरशीची झालेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा पवित्रा घेतल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन हे बहुमताच्या जवळ पोहोचले असतानाही ट्रम्प हार मानायला तयार नाहीत. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे सांगून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
दरम्यान, ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात गेल्याने अशा परिस्थितीत अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय निवडणुकीच्या निकालांबाबत निर्णय घेऊ शकेल की नाही याबद्दल लोकांमध्ये चर्चा आहे. मात्र, अमेरिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात असे दोनदा घडले आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतली होती.
जॉर्ज बुश यांनी ठोठावला होता २००० मध्ये न्यायालयाचा दरवाजा
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सर्वात अलिकडील प्रकरण 20 वर्ष जुने आहे. अमेरिकेच्या 2000 च्या निवडणुकीत जॉर्ज बुश रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याच वेळी डेमोक्रॅट्सने एल गोर यांना मैदानात उतरवले होते. त्यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल फ्लोरिडामध्ये अडकले होते.
त्यावेळी जॉर्ज बुश फ्लोरिडामध्ये 537 मतांनी आघाडीवर होते. परंतु एल गोर यांनी राज्यातील फेर मतमोजणीची मागणी केली. हा वाद आणखी वाढला आणि बुश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि मतांची फेर मतमोजणी थांबविण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बुश यांच्या बाजूने आला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने मतमोजणीला स्थगिती दिली आणि बुश यांना विजयी घोषित केले होते.
दुसरे प्रकरण 144 वर्षांपूर्वीचे
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे दुसरे प्रकरण 144 वर्ष जुने आहे. 1876 मध्ये, कॉंग्रेसने अंतिम निकालासाठी एक कमिशन नेमले होते. या आयोगाच्या सदस्य म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हाऊस ऑफ रिप्रेंजेटेटिव, सिनेट सदस्य आणि इतर लोकांची निवड करण्यात आली. या लोकांनी मतदानाच्या आधारावर देशाचे पुढील राष्ट्रपती निवडले होते. या निवडणुकीत रूदरफोर्ड बी. हेयस हे डेमोक्रॅट्सच्या सॅम्युअल टिल्डन यांच्यापेक्षा एका मताने जिंकले होते. अशा प्रकारे रुदरफोर्ड बी. हेयस देशाचे 19 वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते.
असा इतिहास असताना आता ट्रम्प यांनी निवडणूक निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे चिंताजनक आहे. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी अॅमी कोने बेनेट यांना सुप्रीम सर्वोच्च नायालायाचे न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यावेळी बेनेट यांच्या उमेदवारीवरून देशात बरेच वादंग झाले होते.