#अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक: जो बिडेन बहुमताच्या अगदी जवळ?

आंतरराष्ट्रीय
Spread the love

News24Pune (Live Updates)-   जगातील महासत्ता असलेला देश अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विद्यामान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत बिडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे चित्र आहे. बिडेन यांनी जवळजवळ बहुमतापर्यंत मजल मारली आहे. 538 इलेक्टोरल वोट्स पैकी बहुमतासाठी  270 मतांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत बिडेन यांच्या पारड्यात 264  इलेक्टोरल वोट्स  पडली आहेत. तर ट्रम्प यांना फक्त 214 मते मिळाली आहे. बिडेन यांना बहुमतासाठी (270) फक्त 6 मते कमी आहेत.

मात्र, अजून अनेक राज्यांचे निकाल येणे बाकी आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. त्यासाठी ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. ट्रम्प यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, “आम्ही काल जिथे जिंकत होतो, तिथे अचानक कसे मागे पडलो.” काल रात्री मी जोरदार आघाडी घेतली होती. बर्‍याच राज्यामध्ये डेमोक्रॅटने मतमोजणीवर नियंत्रण मिळवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

दुसरीकडे बिडेन यांनी म्हटले आहे की विजय आमचाच होणार आहे, असा आमचा विश्वास आहे. परंतु, हा विजय आमच्या एकट्याचा होणार नाही तर तो विजय अमेरिकन जनतेचा, आपल्या लोकशाहीचा आणि  अमेरिकेचा असेल.

दरम्यान, ट्रम्प यांच्या निवडणूक मोहीम चालवणाऱ्यांनी पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया सरकारांवर दावा दाखल केला आहे. या राज्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपले प्रतिस्पर्धी जो बिडेनपेक्षा मागे पडले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *