श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची प्रतीक्षा संपावी :सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांचे गणपत्ती बाप्पाला साकडे


पुणेः- करोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतीक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांपासून पडद्यामागील कलाकारांचे जगण्याचा संघर्ष सुरु असून श्रींच्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांची देखील प्रतीक्षा संपावी असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले.

परिस्थिती बिकट असली तरी पडद्यामागील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करणे थांबवलेले नाही. ह्या संघर्षातून बुद्धिची देवता श्री गणरायच मार्ग काढतील असा विश्वास बाळगत पडद्यामागील कलाकारांपैकी रणजीत सोनावळे यांनी श्रीं च्या मुर्तींचा स्टॉल लावला असून ज्येष्ठ सिने-नाटय कलाकार विजय गोखले यांच्या हस्ते आणि संवाद पुणे व अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे आैपचारीक उद्घघाटन करण्यात आले, त्यावेळी गोखले बोलत होते. यावेळी अशोक सोनावळे, रणजीत सोनावळे, काैस्तुभ सोनावळे, मनोरंजन संस्थचे मनोहर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  रविवारी दिवसभर मटणाच्या दुकानांसहीत सर्व दुकाने उघडी राहणार

गोखले पुढे म्हणाले, रंगमंचीय अविष्कार बंद असल्याने कलेचे उपासक बॅक स्टेज आर्टीस्ट यांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. अशा वेळी स्वतःच्या उपजीवीकेसाठी बुद्धी चातुर्य वापरून आणि कोणत्याही स्तरावर जाऊन कष्ट उपसण्याची तयारी दाखवत हे कलाकार जगण्याचा संघर्ष करीत आहे. आपण त्यांच्या ह्या सकारात्मक प्रत्यनांना प्रतिसाद द्यायलाच हवा. 

संवाद पुणेचे सुनील महाजन म्हणाले, थोडेच दिवसांत श्रीं चे आगमन होत आहे. दरवर्षी बालगंधर्व मध्ये दहा दिवस श्रीं चे पूजन केले जाते.यंदा बॅक स्टेज आर्टीस्ट रणजीत सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्ननांना प्रतिसाद म्हणुन यंदाच्या वर्षींची मुर्ती त्यांनी बुक केली.

तसेच दरवर्षी  रणजीत सोनावळे यांच्याच कडील श्रीं च्या मुर्तीची बालगंधर्व मध्ये प्रतिष्ठापन करण्यात येईल असे जाहीर केले. रणजीत सोनावळे यांनी लावलेल्या ह्या स्टॉलला पुणेकर भक्तांनी तसेच बालगंधर्व मधील कर्मचा-यांनी भेट देऊन पेणच्या सुबक, शाडूच्या मातीच्या गणेशमुर्तींचे बुकिंग करीत बॅक स्टेज आर्टीस्ट रणजीत यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा,  असे आवाहन देखील महाजन यांनी केले तसेच बुकिंग साठी पुणेकरांनी

अधिक वाचा  शिवभोजन थाळी ठरली निराधारांसाठी वरदान..

सर्वे नंबर ११७,रामेश्वर अपार्टमेंन्ट, शॉप.नंबर २, पुलाचीवाडी, स्टे वेल हॉटेल समोर, साई सर्व्हिस स्टेशन, कलमाडी पेट्रोल पंपा मागे ,डेक्कन जिमखाना, पुणे येथे अथवा 8888538835 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

रणजीत सोनावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अशोक सोनावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love