‘छावा’ चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता : राजेशिर्के घराण्याची बदनामी  झाल्याचा वंशजांचा आरोप

'छावा' चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
'छावा' चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

पुणे(प्रतिनिधि)–छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी  झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करू, असा इशारा राजेशिर्के यांच्या वंशजांनी शुक्रवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि शिर्के कुटुंबीयांचे वंशज अमित राजे शिर्के, किशोर राजे शिर्के आदींनी शुक्रवारी (दि. २१) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी  त्यानी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना संबंधित घटनांचे पुरावे, संदर्भ दाखवावे, यासाठी नोटीस बजावली आहे. खरं तर चित्रपटामध्ये ते दाखवण्यापूर्वी आमच्या घराण्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे दिग्दर्शक उतेकर यांनी ते बदनामीकारक प्रसंग चित्रपटातून काढून टाकावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दीपक शिर्के यांनी दिला आहे.

अधिक वाचा  अंगणवाडी महिला सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन : पंकजा मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी

राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानंतरही हे आरोप कसे केले जात आहेत? इतिहास गायब केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा सांगितला नाही, असा दावा त्यांनी केला

या चित्रपटात शंभूपत्नी महाराणी येसूबाई साहेब यांचे थोरले बंधू श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांना फितूर दाखवले आहे. याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना शिर्के घराण्याची. बदनामी केली जात आहे, असा आरोप शिर्के घराण्यातील वंशजांनी केला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक व लेखक दोघांचाही निषेध करत  दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा  .. आणि अजित पवार यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या ..

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि ४०  दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात. चित्रपटातील या सीनमुळं राजेशिर्के घराण्याची बदनामी झाल्याचा दावा वारसदारांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

 

.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love