पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले


पुणे-सलग दोन दिवस पुणे शहराला रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. शहरातील रोजची इंजेक्शनची मागणी किमान अठरा हजार इतकी असूनही शहराला पुरेसा पुरवठा नाही, हे अत्यंत गंभीर आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून पुणे शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप मुळीक यांनी यावेळी केला.

पुणे शहरातील वाढत्या कोरोनाच्या संकटात रुग्णांना रेमडीसिव्हर  इंजेक्शन उपलब्ध होत नाहीयेत. प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुण्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळवण्यासाठी शहरभर वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना मानसिक आधार देण्याऐवजी प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. नागरिकांमध्ये प्रशासन आणि सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत, असे पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अधिक वाचा  पुणेकरांची पहिली पसंती मुरलीधर मोहोळच, माध्यमांच्या सर्व्हेमध्ये अव्वल; कसा झाला सर्व्हे?

मुळीक म्हणाले, “एकीकडे नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे तर दुसरीकडे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. काळयाबाजारात चढ्या किमतीने हे इंजेक्शन विकले जात आहे. अक्षरशः २५ हजार रुपयांपर्यंत वगैरे याची किंमत पोचल्याचे समजते.  रेमडीसिव्हर इंजेक्शन काळ्याबाजारात उपलब्ध आहे परंतु प्रशासनाकडे याचा प्रचंड तुटवडा आहे, ही परिस्थिती अत्यंत निंदनीय आहे.”

पुणे जिल्हा प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने आणि तातडीने प्रयत्न करून रेमडीसिव्हर पुणेकर नागरिकांना त्वरित आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे . मागचे तीन दिवस पुण्यामध्ये एकही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सुमारे ३६००० इंजेक्शनची आज पुण्यामधील रुग्णांना तातडीने आवश्यकता आहे. त्याच बरोबर पुढील काळामध्ये रोज आवश्यक असणारे इंजेक्शन शहराला मिळतील याची व्यवस्था आणि खात्री करण्याची गरज आहे.

अधिक वाचा  परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त;रस्त्यावर झोपून आंदोलन

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांना पुण्याच्या कोरोना परिस्तिथीबद्दल भेटले होते. तेव्हा हे सर्व प्रश्न आणि अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. परंतु प्रशासनाने अजूनही यावर ठोस उपाययोजना केलेली नाही, अशीही माहिती आंदोलनाच्या वेळी देण्यात आली.

पुण्यातील ऑक्सीजन उपलब्धतेचा प्रश्न देखील अत्यंत उग्र स्वरूप धारण करत आहे. आज पुणे विभागाला साधारणता ३५० ते ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असताना जेमतेम १५ ते २० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. प्रशासनाने आणि सरकारने या विषयावर गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत तर पुणेकर नागरिकांना येत्या काळात भीषण परिस्थितीला तोंड द्यायला लागेल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासन आणि सरकारवर राहील, असे यावेळी मुळीक म्हणाले.

अधिक वाचा  मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा -विनायक मेटे

याआंदोलनात शहराध्यक्ष जगदीश मुळीक, मा मंत्री दिलीप कांबळे,सभागृह  नेते गणेश बिडकर,सरचिटणीस गणेश घोष,राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, दिपक पोटे, अर्चना पाटील, दिलीप काळोखे, महेश पुंडे सहभागी झाले होते. संचारबंदी आणि कोरोनाचे नियम सांभाळून आंदोलन करण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love