लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला तुकाराम बीज सोहळा

पुणे–वैष्णवांनी फुललेला इंद्रायणीचा तीर… कीर्तन, प्रवचनांचा चाललेला निरंतर जागर… टाळ, मृदंगाचा गजर.. भाविकांच्या मुखातून निघणारा तुकोबारायांच्या नामाचा अखंडीत जयघोष… यामुळे देहूनगरी गुरुवारी  ‘तुकोबा’मय होऊन गेली. मध्यान्हीची वेळ झाली अन् सार्‍यांच्याच नजरा ‘नांदूरकी’च्या पाना – पानावर एकवटल्या. पानांची सळसळ होताच ‘तुकाबा-तुकोबा’ असा घोष करीत उपस्थित भक्त – भागवतांनी पुष्पवृष्टी केली. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा […]

Read More

धिरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा : सोनाली मारणे

पुणे–संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांविषयी बदनामीकारक आणि धादांत खोटारडे वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात धिरेंद्र शास्त्रीच्या फोटोला उपस्थित महिलांनी चप्पल मारून संताप व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारणे पुढाकार घेऊन […]

Read More

याला दुर्दैवी योगायोग म्हणावा काय? – गोपाळदादा तिवारी : बाबा धिरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाईची मागणी

पुणे- महाराष्ट्राच्या मानबिन्दुंची, अस्मितेची व श्रध्दास्थाने असलेल्या संतांची व महापुरुषांची सतत अवहेलना करण्याचे प्रयत्न भाजपच्या सत्ताधिशांच्या नाकाखाली चालली आहेत. हा दुर्दैवी योगायोग म्हणावा काय?  असा सवाल करत संतांच्या चारीत्र्याची पुरेशी माहीती नसतांना, उत्तराखंडचे बाबा धिरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे श्रध्दास्थान जगदगुरू संत तुकाराम महाराजांविषयी चुकीची वक्तव्ये करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केल्या बद्दल त्यांच्यावर कारवाई करावी […]

Read More

माऊलींच्या पालखी सोहळ्याने विठुनामाच्या बळावर दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे लीलया केली पार

पुणे— विठ्ठल भक्तीने भिजला दिवे घाट । जाहली सोपी वाट । पंढरीची ।। दिंडय़ादिंडय़ातून होणारा विठुनामाचा घोष…अन् टाळ-मृदंगाचा झंकार…….अशा अत्यंत भारावलेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने विठुनामाच्या बळावर नयनरम्य दिवे घाटाची अवघड व नागमोडी वळणे शुक्रवारी लीलया पार केली…आणि सायंकाळी माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दोन […]

Read More

भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे-टाळ मृदंगाचा अखंड गजर…भगव्या पताकांची फडफड…विणेचा झंकार…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् मागील दोन वर्षे विठ्ठल दर्शनापासून अंतरल्याने विठुरायाच्या भेटीची लागलेली आस…अशा भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.  धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव |  तेथे नांदे देव | पांडुरंग ।।  अशा शब्दांत ज्या देहूचे माहात्म्य वर्णिले […]

Read More

संत तुकारामांचा ‘उंच नीच काही नेणे भगवंत’ हाच घेऊन विचार आमचे सरकार काम करत आहे – पंतप्रधान मोदी

पुणे—‘उंच नीच काही नेणे भगवंत’, यासारख्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये उच्च-नीच दृष्टीकोन, माणसा-माणसात भेद करणे हे खूप मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा उपदेश भगवद्भक्तीइतकाच राष्ट्रभक्तीसाठीदेखील महत्त्वाचा आहे. वारकरी बांधवही हा संदेश घेऊन दरवर्षी वारीमध्ये भक्तीचा जागर घडवत असतात. हाच विचार घेऊन आमचे सरकारदेखील कोणताही भेदभाव न बाळगता व सर्वांना सोबत घेत प्रत्येक […]

Read More