शरद पवार यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील

पुणे: शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो,’  त्यामुळे शरद पवार  यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर   यांचं म्हणणं योग्यच आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यातील मराठा समाजाला शरद […]

Read More

चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.   चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन का घेत […]

Read More

तर मी लगेच खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार : संभाजीराजे छत्रपती

सोलापूरः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीला याबाबत दोषी धरले आहे. तर महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, या प्रश्नी भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता आक्रमक झाले असून त्यांनी कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी […]

Read More

उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीत जीव गुदमरतोय!

पुणे-गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना मी ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चाललंय ते त्यांना आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली […]

Read More

सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !

मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहेमीच सोशल मिडियावरील त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्याची एकही संधी  त्या सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा काल वाढदिवस होता. त्यांनी बहुधा तो कुटुंबाबरोबर साजरा केलेला दिसतो. त्यांनी त्यांचा […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात तिसरा मंत्री लवकरच राजीनामा देणार:तो मंत्री कोण?

पुणे-महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार  आणि मुख्यमंत्री […]

Read More